दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर याप्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. अशातच आता भाजपचे राम कदम यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो नोटेवर छापण्यात यावे अशी मागणी केली आहे. यासंदर्भात राम कदम यांनी केलेले ट्वीट देखील चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.
काय आहे राम कदमांचे ट्वीट
राम कदम यांनी जे ट्वीट केले त्यामध्ये पाचशेच्या नोटांचे चार फोटो शेअर केले आहेत. एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर सावरकर तर चौथ्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशा चार नोटांचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी! अशी कॅप्शन दिली आहे. त्यांचे हे ट्विट व्हायरल होत असून ते चर्चेत आले आहे.
(हेही वाचा – ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र बाद? अखेर निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, “शपथपत्र बाद करण्याचा….”)
अखंड भारत.. नया भारत.. महान भारत..
जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl
— Ram Kadam (@ramkadam) October 27, 2022
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्र सरकारकडे महात्मा गांधींसह गणपती आणि लक्ष्मी यांची प्रतिमा भारतीय चलनी नोटांवर लावण्याची मागणी केली. बुधवारी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी अर्थव्यवस्थेची चांगली स्थिती आणि देशाला विकसित करण्यासाठी ‘देव-देवतांचा आशीर्वाद’ आवश्यक असल्याचे म्हणत हे सांगितले. नोटेच्या एका बाजूला गांधींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी-गणेशाचा फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.
Join Our WhatsApp Community