- प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी गुरुवारी (२१ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन केली. त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देताना भाजपा (BJP) प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस शासित राज्यात अदानी यांना कुणाला मदत केली, याचे उत्तर आधी द्यावे, असे आव्हान केले. तर अदानी यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, त्याची काळजी राहुल गांधी यांनी करू नये, असा पलटवार देखील पात्रा यांनी केला. यामुळे दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : सट्टा बाजारचा कौल कोणाला? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार?)
भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, यावरून आता देशातील राजकारण तापलं आहे. काँग्रेस खासदार यांनी या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. तर त्यांच्या आरोपांना आता भाजपाने (BJP) प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा (BJP) प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर पलटवार केला आहे.
(हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पांड्या टी-२० अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल)
अमेरिकेत दाखल खटल्यात ज्या चार राज्यांचा उल्लेख आहे. त्या तामिळनाडू, ओडीसा, छत्तीसगड आंध्र प्रदेश चारही राज्यात त्यावेळी काँग्रेसचं राज्य होतं. तिथे आमचं सरकार नव्हतं. त्यामुळे राहुल गांधींनी आरोप करण्यापेक्षा तिथे जाऊन चौकशी करावी असं पात्रा यांनी म्हटलं आहे. शिवाय या प्रकरणात कायदानुसार कारवाई कली जाईल असंही ते यावेळी म्हणाले. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community