विधानपरिषदेसाठी Madhav Bhandari यांचे नाव आघाडीवर!

36
विधानपरिषदेसाठी Madhav Bhandari यांचे नाव आघाडीवर!
  • खास प्रतिनिधी 

विधानपरिषदेतील पाच आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांची परिषदेतील जागा रिक्त झाली. त्या जागांसाठी २७ मार्च २०२५ या दिवशी निवडणूक होणार असून भाजपाच्या तीन जागांपैकी एका जागेवर प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भांडारी यांना आमदारकी दिल्यास त्यांच्यावरील अन्याय दूर होईल, अशा भावना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहेत.

(हेही वाचा – मालेगावमध्ये Vote Jihad साठी ‘फंडिंग’ ; माजी आमदार आसिफ शेख यांचा गौप्यस्फोट)

चार दशकांहून अधिक काळ सक्रिय

गेली जवळपास दहा वर्षे प्रत्येक राज्य सभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भांडारी (Madhav Bhandari) यांच्या नावाची चर्चा होत असते. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी न देता अन्य नेत्याला आमदारकी किंवा खासदारकी दिली जाते. ७०-वर्षीय भांडारी गेल्या चार दशकांहून अधिक काळ भाजपामध्ये सक्रिय असून विविध पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण?)

भाजपाला तीन जागा

विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून पाच जागांपैकी भाजपा तीन आणि शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक-एक जागा आहे. २७ मार्च या दिवशी विधानपरिषद निवडणूक मतदान होणार असून विधानसभेतील आमदार यासाठी मतदान करतील. विधानसभेत २८८ आमदार असल्याने पाच जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यास ५७ मतांचा कोटा लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.