Mamata Banerjee : केजरीवालांच्या अटकेनंतर भाजपाचा ममतांना इशारा; लवकरच होणार अटक ?

लक्षणीय बाब म्हणजे, ५० दिवसांच्या आत देशातील दोन राज्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात गेले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन याशिवाय दाक्षिणात्य आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या के. कविता यांनाही दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

272
Mamata Banerjee : केजरीवालांच्या अटकेनंतर भाजपाचा ममतांना इशारा; लवकरच होणार अटक ?

नुकताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आता भाजपाची नजर पश्चिम बंगालच्या (Mamata Banerjee) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही पडली आहे. आता लवकरच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही वेळ येणार असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – CM Arvind Kejriwal यांना अटक; दारू घोटाळ्यातील चौकशीनंतर ED ची कारवाई)

त्यांनी बंगालीमध्ये एक डायलॉग लिहिला आहे, ज्याचा हिंदी अनुवाद असा आहे की – चाहे जितना रो-धो लो, मफलर के बाद अब हवाई चप्पल की बारी है। प्रतीकात्मकरीत्या केजरीवालांसाठी मफलर वापरला जातो, तर ममता बॅनर्जीसाठी (Mamata Banerjee) हवाई चप्पल वापरतात.

(हेही वाचा – Arvind Kejriwal : मुख्यमंत्रीपदी असतांना अटक झालेले अरविंद केजरीवाल हे कितवे मुख्यमंत्री ?)

ईडीच्या आरोपानंतर भाजपा आक्रमक :

खरं तर, केंद्रीय एजन्सीने यापूर्वीच तृणमूल कॉंग्रेसचे माजी राज्यसभा खासदार के. डी. सिंग यांच्या चिट फंड कंपनी अल्केमिस्ट प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे नाव ओढले आहे. केंद्रीय एजन्सी ई. डी. ने जारी केलेल्या निवेदनातून असे सांगितले आहे की; अल्केमिस्ट प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू आहे. कंपनीच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवडणूक कार्यक्रमांसाठी अल्केमिस्टच्या पैशांवर हेलिकॉप्टरचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांनी याचा वापर केला होता. याशिवाय केंद्रीय एजन्सी रोज व्हॅली आणि शारदा चिट फंडासह इतर प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या संबंधांबद्दलही सांगत आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून भाजपा पक्ष आक्रमक झाला आहे.

(हेही वाचा – Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा ‘हा’ व्हिडिओ का होतोय व्हायरल ?)

५० दिवसांच्या आत देशातील दोन राज्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात :

लक्षणीय बाब म्हणजे, ५० दिवसांच्या आत देशातील दोन राज्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात गेले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन याशिवाय दाक्षिणात्य आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या के. कविता यांनाही दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपाने ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याविषयी असा दावा केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.