नाशिक राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे बघावयास मिळाली आहे. तर केवळ देवळा नगरपंचायतीत भाजपला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले आहे.
यामध्ये निफाड नगरपंचायत एकूण १७ जागांपैकी शिवसेनाला ७, शहर विकास आघाडी ४, राष्ट्रवादी ३, कॉंग्रेस १, बसपा १, अपक्ष १ मिळाली आहे. दिंडोरी नगर पंचायतिच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला विक्रमी ६ जागा मिळाल्यात आहेत त्यात शिवसेनेची १ जागा अगोदर बिनविरोध झालेली होती. कॉंग्रेसला २ तर राष्ट्रवादीला ५ जागा मिळाल्या आहेत.
सुरगाणा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी शिवसेना ६ माकप २ भाजप ८ राष्ट्रवादी १ जागा मिळाली आहे. कळवण नगरपंचायतच्या एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादीने ९ जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. याठिकाणी शिवसेनेला २ तर कॉंग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. तसेच भाजपला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर मनसेनेला १ जागा याठिकाणी मिळाली आहे. तसेच पेठ नगरपंचायतीत एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादीला ८, शिवसेनेला ४, माकपला ३, भाजपला १ तर १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. देवळा नगर पंचायतीत एकूण १७ जागांपैकी भाजपला १५ तर राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community