काळे झेंडे – काळी पट्टी बांधून राज्यात होणार आंदोलन – Nana Patole

95
काळे झेंडे - काळी पट्टी बांधून राज्यात होणार आंदोलन - Nana Patole
काळे झेंडे - काळी पट्टी बांधून राज्यात होणार आंदोलन - Nana Patole

काँग्रेसच्या (Congress) विभागीय बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नाशिक मध्ये आले होते त्यानंतर शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बंद बाबत न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयाचा काँग्रेस आदर करत आहे. त्यासाठी म्हणून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तोंडाला काळी पट्टी आणि हातामध्ये काळे झेंडे (Black Falg) घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट करताना पुढे सांगितले की जर नागरिकांनी स्वतःहून दुकाने बंद केली तर ते आमचा कोणताही संबंध राहणार नाही तो नागरिकांनी पुकारलेला उत्स्फूर्त बंद असेल. (Nana Patole)

(हेही वाचा – महाराष्ट्र बंद मागे घ्यावा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर Sharad Pawar यांचे मविआला आवाहन)

दंगली होता म्हणून बंद बाबत निर्णय झाला असे म्हटले असता नाना पटोले यांनी सांगितले की चार दिवसापूर्वी नाशिक मध्ये काय झाले त्याची आठवण करून देत राज्यांमध्ये दंगलखोरच सरकार बसलेले आहे त्यामुळे दंगली होणारच यामध्ये कोणतीही दुमताची भावना नसावी. असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. (Nana Patole)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.