निवडणूक आयोगाकडून मतदारांची अडवणूक हा मोदी सरकारचा डाव; Uddhav Thackeray यांचा आरोप

169

निवडणूक आयोगाकडून मतदारांची अडवणूक करणे आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवणे हा हा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी, 20 मे रोजी मतदान पार पडले. यावेळी मुंबईतील काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदानात अडथळा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. यावर उबाठा शिवसेनेसह विरोधी पक्षानी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तक्रारी केल्या. या संदर्भात शिवसेना भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर गंभीर आरोप केले.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगांवर भाजपाही नाराज; मतदारांचे हाल दुर्दैवी, Pravin Darekar काय म्हणाले? वाचा सविस्तर…)

रात्रीचे कितीही वाजले तरी तुमचे मतदान केल्याशिवाय जावू नका 

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, नागरिकांना मी आवाहन करतो आहे की तुम्हाला मतदान करता येऊ नये हा मोदी सरकारचा डाव आहे. तुम्ही मतदानाला उतरु नये, त्यांच्या विरोधातील मतदान कमी कसे होईल ते सत्ताधारी बघत आहेत. त्या डावाला बळी न पडता तुम्ही मतदान केंद्रामध्ये जावून उभे राहा. मतदान केल्याशिवाय मतदानकेंद्र बंद होत नाहीत. त्यामुळे पहाटे पाच वाजले तरी मतदानाचा हक्क बजावा. ज्या ठिकाणी निवडणूक अधिकारी, निवडणूक प्रतिनिधी विलंब लावत आहेत, कारण नसताना तुम्हाला छळत आहेत, तुमची आयडी, नावे, ओळखपत्र यावरुन वेळ लावत आहेत, त्यांची नावे आम्हाला कळवा. त्याची तक्रार जवळच्या शिवसेनेच्या शाखेत करा, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. आपण या अधिकारी आणि निवडणूक प्रतिनिधींची नावे थेट पत्रकार परिषद घेऊन जाहीर करु, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच रात्रीचे कितीही वाजले तरी तुमचे मतदान केल्याशिवाय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.