जे परदेशींना जमले, ते चहल यांना कधी जमणार?

जे काम परदेशी यांना जमले होते, ते काम चहल यांना अजूनही जमलेले दिसत नाही.

78

मुंबईतील अनेक रस्त्यांवर तसेच फूटपाथवर रहिवाशांकडून वाहने उभी केली जातात. परंतु अशाप्रकारे उभ्या केलेल्याा वाहनांचा वापर केला जात नसून, सार्वजनिक जागी सोडून दिलेल्या भंगारवजा वाहनांमध्ये पावसाळ्यात पाणी साचून डेंग्यू व मलेरियाचा प्रार्दुभाव होतो. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी रस्त्यांवरील या बेवारस पडलेल्या आणि वापरात नसलेल्या वाहनांवर कारवाई करुन त्यांची विल्हेवाट लावण्याची आणि संबंधित वाहन मालकांविरोधात कारवाई करण्याची मोहीम राबवली होती. परंतु दोन वर्षांपूर्वी ही मोहीम राबवण्यात आली असली, तरी आजही अनेक विभागांमध्ये अशाप्रकारे लोकांनी बेजबाबदारपणे वाहने उभी केलेली असून, यामुळे वाहतुकीची कोंडी तसेच डेंग्यू मलेरियाचा फैलाव होत आहे. मात्र, जे काम परदेशी यांना जमले होते, ते काम चहल यांना अजूनही जमलेले दिसत नाही.

आयुक्तांचे निर्देश

मुंबईत सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर सोडून दिलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा होण्यासोबतच, सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. तसेच या वाहनांच्या टपावर किंवा वाहनांमध्ये पाणी साचून त्यात डेंग्यू-मलेरियाचा प्रसार करणा-या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन अशाप्रकारे सोडून दिलेल्या वाहनांबाबत राज्य शासनाचे परिवहन आयुक्तालय व आर.टी.ओ. यांच्या सहकार्याने मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या अनुषंगाने सोडून दिलेली वाहने जप्त करुन ती ठेवता यावीत, यासाठी तळोजा परिसरातील एमएमआरडीएच्या एका भूखंडावर व्यवस्था करण्यात आली आहे.

(हेही वाचाः मुंबईत पुन्हा वाढतेय रुग्ण संख्या!)

अशी होते कारवाई

रस्त्यांवर सोडून दिलेल्या आणि वाहतुकीला अडथळा होणाऱ्या वाहनांच्या मालकांविरुद्ध आजवर कोणतीही ठोस अशी कारवाई केली जात नव्हती. हे लक्षात घेता अत्यंत बेजबाबदारपणे रस्त्यावर वाहने सोडून देणा-या वाहन मालकांविरोधात मुंबई पोलिस, परिवहन आयुक्तालय, वाहतूक पोलिस, आर.टी. ओ. यांच्या सहकार्याने गुन्हे दाखल करण्यासह कठोर कारवाई करण्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्त आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी घेतला होता. त्या वाहनांच्या नंबर प्लेटवर नमूद केलेल्या वाहन क्रमांकाच्या आधारे वाहन मालकांचा शोध घेतला जाईल. नंबर प्लेट नसल्यास किंवा नंबर वाचनीय नसल्यास ‘वाहन चॅसिस’ क्रमांकाच्या आधारे आणि आर.टी.ओ. च्या सहकार्याने वाहन मालकाचा शोध घेऊन त्यांच्या पत्त्यावर दंड आकारणी करण्याबाबत नोटीस पाठवण्यात येईल. त्यात नमूद केलेल्या मुदतीमध्ये दंड जमा करुन वाहन घेऊन न गेल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच जप्त केलेले वाहन हे भंगार म्हणून लिलावात विकण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता.

कोरोना काळात कारवाईची तीव्र गरज 

यानुसार रस्त्यांवर सोडून दिलेल्या वाहनांच्या विरोधात मोहीम स्वरुपात कार्यवाही सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याला व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तानां दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये कारवाईला सुरुवात झाली होती. परंतु परदेशी यांची बदली झाल्यानंतर नवीन आयुक्त हे कोरोनाचा सामना करत असून, कोरोनाबरोबरच रस्त्यांवरील बेवारस वाहने ही या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाला आमंत्रण देणारी असून, ही मोहीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्याची तीव्र गरज आहे.

(हेही वाचाः मुंबईत पुन्हा वाढतेय रुग्ण संख्या!)

प्रशासनाचे दुर्लक्ष

मात्र, परदेशी यांनी जे धाडसी पाऊल उचलले होते, ते पाऊल चहल यांना उचलता येत नाही. किंबहुना अशाप्रकारचा निर्णय मुंबई महापालिकेने यापूर्वी घेतला आहे याचाही विसर त्यांना पडलेला आहे. सध्या मुंबई महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेही काम नसून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती ठरणारे हे अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही मोहीम राबवणे आवश्यक असतानाही प्रशासनाचे याकडे लक्ष दिसून येत नाही.

आपल्या परिसरात सुद्धा अशाप्रकारे गाड्या पार्क करण्यात आल्या असतील, तर त्याची तक्रार तुम्हाला तुमच्या वॉर्डच्या ट्विटर अकाऊंटवर करता येईल. त्यासाठी खालील वॉर्डच्या ट्विटर अकाऊंटशी संपर्क साधा.

महापालिका अधिकृत ट्विटर-

https://twitter.com/mybmc

एस वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardS

आर-एस वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardRS

पी-एन वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardPN

पी-एस वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardPS

जी-एस वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardGS

एन वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardN

सी वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardC

एल वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardL

डी वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardD

ए वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardA

बी वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardB

टी-वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardT

ई वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardE

एफ-एस वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardFS

एम-ई वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardME

एम-डब्ल्यू वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardMW

एफ-एन वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardFN

एच-डब्ल्यू वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardHW

के-डब्ल्यू वॉर्ड-

https://twitter.com/mybmcwardKW

के-ई वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardKE

आर-एन वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardRN

जी-एन वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardGN

आर-सी वॉर्ड-

https://twitter.com/mybmcWardRC

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.