BMC : मुंबईतील ‘या’ भागांत दरड कोसळण्याची भीती; महापालिका सजग

195

पावसाळा आता तोंडावर आला आहे. वाढणारे खड्डे, विस्कळीत होणारी रेल्वे व्यवस्था, वाहतूककोंडी याच्या सोबतीला आणखी एक समस्या दरवर्षी मुंबईकरांना त्रासदायक ठरते. ती समस्या म्हणजे पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी. या दिवसांत मुंबईतल्या डोंगराळ भागातील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील दरडी कोसळण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणांची यादी बनवण्यात आली आहे. शहरात एकूण २७९ दरडींची ठिकाणे आहेत. त्यापैकी ७४ ठिकाणे धोकादायक स्थितीत आहेत तर ४५ ठिकाणे अतिधोकादायक स्थितीत आहेत. जर मुसळधार पाऊस पडला तर त्या भागात कधीही दरड कोसळू शकते असे पालिकेने केलेल्या पावसाळापूर्व पाहणीत समोर आले आहे.

‘या’ भागांवर चिंतेचे सावट

  • मलबार हिल
  • ताडदेव
  • वरळी
  • अॅण्टॉप हिल
  • घाटकोपर
  • असल्फा गाव
  • विक्रोळी
  • सूर्यनगर
  • चेंबूर वाशीनाका
  • भांडूप
  • चुनाभट्टी
  • कसाई वाडा

(हेही वाचा Rahul Narvekar : आमदारांच्या अपात्रतेवर कधी निर्णय घेणार; विधानसभा अध्यक्षांनी सविस्तर सांगितले)

महापालिकेच्या शाळेत केली जाते निवाऱ्याची सोय

दरडी कोसळून जखमी किंवा मृत्यू होणाऱ्या घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी पालिका अतिधोकादायक दरडींच्या ठिकाणी वसलेल्या झोपड्यांतील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देते. गंभीर परिस्थितीत त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येते. अनेकदा पालिकेतर्फे त्यांची पालिकेच्या शाळेत तात्पुरता निवाऱ्याची सोय करण्यात येते.

महापालिकेकडून कोणत्या उपाययोजना?

दरडी कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी पालिका दरवर्षी प्रयत्न करते. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने उपाययोजनांबद्दल अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पावसाआधी दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे, लोखंडी दोर बांधणे, मातीची धूप थांबवणे, भिंतीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा बनवणे अशा उपाययोजना पालिकेद्वारे राबवल्या जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.