BMC Election : महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षण लॉटरी सोडत जाहीर; कोणाच्या प्रभागाचे काय आरक्षण जाणून घ्या

153

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता यापूर्वी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुन्हा एकदा अनुसूचित जाती व जमातीची लॉटरी सोडत सोडत अन्य प्रभागांकरता ओबीसीसह नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसीच्या आरक्षण सोडतीमुळे मागील वेळेस सुपात असलेले संभाव्य उमेदवार आता जात्यात गेले आहे. या लॉटरीचा पुन्हा एकदा फटका माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना बसला असून मागील वेळेस प्रभाग सुरक्षित राहिल्या राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांचा प्रभाग महिला ऐवजी ओबीसी महिला राखीव झाला आहे. तर भाजपचे माजी पक्षनेते विनोद मिश्रा यांचा प्रभाग महिला आरक्षित झाला होता, पण या नव्या लॉटरी सोडतीत त्यांचा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.

( हेही वाचा : अंधेरीत चित्रकूट मैदानात सिनेमाच्या सेटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल )

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढण्यात आली. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार, उपायुक्त संजोग कबरे, करनिर्धारण व संकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते आदींसह निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या या निवडणुकीतील २३६ प्रभागांपैंकी ५० टक्के अर्थात ११८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यात अनुसूचित जाती महिलांसाठी ८, अनुसूचित जमाती महिलांसाठी १ व ओबीसी महिला प्रवर्गासाठी ३२ अशा ४१ आणि महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७७ प्रभाग राखीव ठेवून त्यानुसार त्यांची आरक्षण सोडत काढण्यात आली. तर उर्वरीत सर्व जागा खुल्या आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जातीकरता ०७, अनुसूचित जमातीकरता ०१, ओबीसी प्रवर्ग ३१ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७९ अशा प्रकारे एकूण ११८ प्रवर्ग आरक्षित करण्यात आले आहे.

अशाप्रकारे आहेत नागरिकांच्या मागासवर्गातील ३२ महिलांचे प्रभाग (ओबीसी महिला प्रभाग):

७,९,१३,१७,२७,३०,३८,४८,५१,५३,६२,७९,८७,८९,९६,९८,११७,१२९,१३०,१३७,१४७,१५०,१५२,१५५,१५९,१६१,१७९,१८०,१८५,१८८,२०२,२१७,

नागरिकांच्या मागासवर्गातील ३१ आरक्षित प्रभाग (ओबीसी प्रभाग):

३,१२,१६,४०,४२,६१,७३,७६,८१,८२,१०१,११०,१२७,१२८,१३२,१३५,१४६,१४८,१५४,१६४,१७३,१७४,१८३,१९५,२००,२०३,२१८,२२२,२२३,२३०,२३६

सर्वसाधारण प्रवर्ग महिला आरक्षण सोडत(सर्वसाधारण महिला :७७ प्रभाग)

२,५,१०,२१,२२,२३,२५,२८,२९,३३,३४,३९,४५,४६,४९,५२,५४,५७,५९,६४,६७,६९,७४,८०,८६,९०,९२,९५,१००,१०३,१०४,१०६,१०९,१११,११८,१२०,१२१,१२२,१२५,१३१,१३४,१४२,१४४,१४५,१५१,१५६,१६३,१६८,१६९,१७०,१७१,१७२,१७५,१७७,१७८,१८१,१८२,१८४,१८६,१८७,१८९,१९१,१९२,१९६,२०१,२०५,२०७,२१२,२१३,२२०,२२५,२२६,२२७,२२९,२३१,२३३,२३४

सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण : ७९ प्रभाग

१,४,६,८,११,१४,१५,१८,१९,२०,२४,२६,३१,३२,३५,३७,४१,४३,४४,४७,५०,५६,५८,६३,६५,६६,६८,७०,७१,७२,७५,७७,७८,८३,८४,८८,९१,९३,९४,९७,९९,१०२,१०५,१०८,११२,११३,११४,११५,११६,१२३,१२६,१३३,१३६,१३८,१४०,१४१,१४३,१४९,१५८,१६०,१६६,१६७,१७६,१९३,१९७,१९८,१९९,२०६,२०९,२१०,२११,२१४,२१६,२१९,२२४,२२८,२३२,२३५

New Project 1 22

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.