Bmc election 2022 mulund T Ward;शिवसेनेला नामोहरम करणाऱ्या सोमय्यांचा मुलगा बसणार घरी; सोमय्यांच्या घरातून आता निवडणूक लढवणार कोण?

143

मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षणात भाजप नगरसेवकाचे प्राबल्य असलेल्या मुलुंड येथील टी विभागात भाजपला विद्यमान तीन नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. महापालिकेतील भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे आणि नील सोमय्या यांचे प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. यापैंकी प्रभाकर शिंदे व गंगाधरे यांचे जुने प्रभाग आता खुले झाल्याने, त्यांना आता आपल्या जुन्या प्रभागात परतता येईल. परंतु नील सोमय्या यांच्यासाठी आता प्रभागच नसल्याने त्यांना आपल्या पत्नीला किंवा घरातील अन्य महिला उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. किरीट सोमय्या यांच्याप्रमाणे नील सोमय्यांना घरी बसवण्याची शिवसेनेची इच्छा आरक्षणात तरी पूर्ण झालेली दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षणात खासदार मनोज कोटक, महापालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे, नील सोमय्या यांचे प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत, तर समिता कांबळे आणि  रजनी केणी यांचे प्रभाग खुले झाले आहेत आणि प्रकाश गंगाधरे  यांचा प्रभाग एससी महिला राखीव झाला आहे. मनोज कोटक  यांचा प्रभाग महिला आरक्षित झाला असला तरी ते खासदार असल्याने त्याचा एवढा परिणाम होणार नाही. परंतु हा प्रभाग खुला झाला असला तरी कोटक यांचे बंधू किंवा जवळचे मित्र यांना उमेदवारी दिली गेली असती. परंतु महिला आरक्षित झाल्याने या प्रभागातील महिला पदाधिकाऱ्यांची वर्णी लागणार आहे.

भाजप उमेदवाराच्या विजयात ठरु शकतात अडसर 

रजनी केणी यांचा नवीन प्रभाग हा प्रभाकर शिंदे यांचा जुना प्रभाग असल्याने या खुल्या प्रभागात शिंदे यांची वर्णी लावली जाऊ शकते आणि रजनी केणी यांना प्रभाकर शिंदे यांच्या महिला राखीव प्रभागातून निवडणूक लढवावी लागेल. परंतु रजनी केणी यांच्यावर पक्षाची अवकृपा असल्याने ते त्यांना तिकीट देणार का इथून प्रश्न आहे. जर पक्षाची कृपा राहिल्यास त्यांना प्रभाकर शिंदे यांच्या प्रभागातून सीट दिली जाईल. पण जर पक्षाने तिकीट न दिल्यास रजनी केणी याही आपल्या प्रभागातील हक्क सोडणार नाहीत आणि  त्या जर आपल्या प्रभागातून उभ्या राहिल्या तर भाजप उमेदवारापुढे आव्हान निर्माण करू शकतात. परिणामी भाजप उमेदवाराच्या विजयात मोठा अडसर त्या ठरु शकतात,असे वाटते.

समिता कांबळे यांचा प्रभाग खुला प्रवर्गात आल्याने आणि प्रकाश गंगाधरे यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्गात आल्याने याही निवडणुकीत या दोघांमध्ये प्रभागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. कांबळे यांचा सध्या प्रभाग हा पूर्वीचा गंगाधरे यांचा प्रभाग असल्याने या दोन्ही नगरसेवकांमध्ये प्रभागांची अदलाबदल होऊ शकते.

( हेही वाचा: संजना घाडी, सिध्देश पाटेकर, ऋषीकेश ब्रीदला संधी; ओझांना सरकावे लागणार बाजूला )

उमेदवार कोणाला बनवणार ?

नील सोमय्या यांचा प्रभाग हा महिला राखीव झाल्याने त्यांचे पुनर्वसन कुठे करायचे हा मोठा प्रश्न पक्षाकडे असणार आहे.  किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी शिवसेनेच्या नाकी तोंडी चांगलाच दम आणल्याने सोमय्यांचा पाडाव करण्याची रणनिती शिवसेनेकडून आखली जात होती. पण आरक्षणातच शिवसेनेला अर्धे यश लाभले असून, महिला आरक्षित प्रभाग झाल्याने किरीट सोमय्या यांच्याप्रमाणे नील सोमय्यांना घरी बसवण्याची शिवसेनेची इच्छा आरक्षणात तरी पूर्ण झालेली दिसून येत आहे. त्यामुळे सोमय्या आता नीलला निवडणूक रिंगणात उतरवून शिवसेनेला कसे आव्हान देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे नील सोमय्यांसाठी प्रभाग उपलब्ध न झाल्यास सोमय्या कुणाला उमेदवार म्हणून पुढे करतात याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे

प्रभाग १०३, प्रवर्ग : खुला, (मनोज कोटक,भाजप), नवीन प्रभाग क्रमांक १०६ आरक्षण : महिला

नवीन प्रभाग रचना :  ठाणे महापालिका सामायिक सिमा,दिनदयाळ मार्ग,भांडुप कॉम्प्लेक्स भिंत तानसा पाईप लाईन ,विहार लेक,विणा नगर

प्रभाग १०४, प्रवर्ग : ओबीसी (प्रकाश गंगाधरे,भाजप), नवीन प्रभाग क्रमांक १०७ आरक्षण :एसी महिला

नवीन प्रभाग रचना :तांबे नगर, अशोक नगर, मुलुंड कोर्ट आदी प्रमुख् ठिकाणांसह एम.जी. रोड ओलांडून दिनदयाळ मार्ग कलरस्केप मॉल, एससीसी सिमेंट रोड

प्रभाग १०५, प्रवर्ग : महिला (रजनी केणी,भाजप), नवीन प्रभाग क्रमांक १०८ आरक्षण : खुला

नवीन प्रभाग रचना : दामोजी पाटीलवाडी,मुलुंड डम्पिंग ग्राऊंड अरुणोदय नगर, गवाणपाडा, नवघर आदी प्रमुख ठिकाणांसह चिखला देवी रोड, टाटा कॉलनी रोड, सानेगुरुजी मार्ग, व्ही.बी.फडके मार्ग

प्रभाग १०६, प्रवर्ग : खुला (प्रभाकर शिंदे,भाजप,) नवीन प्रभाग क्रमांक १०९ आरक्षण : महिला

नवीन प्रभाग रचना : आझाद नगर, सज्जनवाडी, एलआयसी कॉलनी या प्रमुख ठिकाणांसह मुलुंड ऐरोली लिंक रोड, नाहुर रोड जंक्शनपर्यंत, रेल्वे लाईनपर्यंत

प्रभाग १०७, प्रवर्ग :महिला (समिता कांबळे, भाजप),नवीन प्रभाग ११०, आरक्षण : खुला

नवीन प्रभाग रचना : आशा नगर, कर्मानगर, पी अँड टी कॉलनी या प्रमुख ठिकाणांसह महात्मा गांधी रोड, पुरुषोत्तम खेराज रोड,गोशाला रोड,एलबीएस रोड सोनापूर सिंग्नलपर्यंत, अरुणकुमार वैद्य चौक

प्रभाग १०८, प्रवर्ग: खुला( निल सोमय्या,भाजप) नवीन प्रभाग १११, आरक्षण : महिला

नवीन प्रभाग रचना :  अमरनगर,हनुमान पाडा, मोतीनगर, पाईपलाईन ओलांडून खिंडीपाडा पुलापर्यंत, खिंडीपाड पूल ओलांडून भांडुप कॉम्प्लेक्सपर्यंत,एसएसजी  रोड, एलबीएस मार्गापर्यंत

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.