BMC Election 2022 : एच पश्चिम विभागात भाजपच्या महिला नगरसेविका सेफ, काँग्रेस नगरसेवकाची धावाधाव

मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम विभागात जिथे मागील निवडणुकीत ३ खुले प्रभाग आणि प्रत्येकी एक महिला, अनूसुचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते, तिथे येत्या निवडणुकीत एकमेव प्रभाग खुला झाला असून उर्वरीत सर्व प्रभाग महिला आरक्षित प्रवर्ग झाले आहेत. त्यामुळे या प्रभागात आता महिलांसाठी पुन्हा संधी आली असून एकमेव प्रभाग खुला झाल्याने काँग्रेसचे आसिफ झकेरिया आणि राजा रहेबर खान यांच्यातच जागेवर मारामारी होणार आहे. त्यामुळे या प्रभागात काँग्रेसकडून कुणाच्या गळ्यात उमेदवारी पडते आणि पुन्हा राजा रहेबर खान यांना अपक्ष म्हणून राहावे लागते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : अनिल परब यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून सहा तास चौकशी)

या वांद्रे, खार व सांताक्रुझ पश्चिम या एच पश्चिम विभागात भाजपच्या हेतल गाला, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे यांचे प्रभाग खुले झाल्याने त्यांचे प्रभाग सेफ झोनमध्ये आहेतच. तर शिवसेनेचे नगरसेवक संजय अगलदरे यांचा प्रभागही महिला आरक्षित झाल्याने आता कोळीवाड्यातील महिलेला संधी मिळण्याची शक्यता आहे.

तर काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांना संपूर्ण विभागात एकमेवर प्रभाग खुला असलेल्या अपक्ष नगरसेविका मुमताज शेख यांच्या प्रभागात जावे लागणार आहे. परंतु मुमताज यांचे पती राजा रहेबर खान हे काँग्रेसमध्ये आल्याने झकेरिया यांच्यासमोर उमेदवारीचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत पक्ष झकेरियांच्याशी पाठिशी राहतील आणि त्यामुळे राजा यांना उमेदवारी मिळणे कठिण जाईल. त्यामुळे झकेरिया यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास राजा यांना पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागेल, किंवा ते एमआयएमकडूनही उमेदवार म्हणून रिंगणात उतरु शकतात,असे बोलले.

सन २०१७च्या निवडणुकीतील प्रभाग आरक्षण : खुला प्रभाग ०३, महिला ०१, अनुसूचित जमाती ०१ व ०१ ओबीसी आरक्षित

२०२२च्या निवडणुकतील प्रभाग आरक्षण : पाच प्रभाग महिला, एक प्रभाग खुला प्रवर्ग

अशाप्रकारे आहे विद्यमान नगरसेवकांचे नवीन प्रभाग व आरक्षण

 • प्रभाग क्रमांक ९७, खुला प्रवर्ग (हेतल गाला,भाजप), नवीन प्रभाग : १००(नवे आरक्षण : महिला)
  प्रभाग रचना : खीरा नगर, बजाज वाडी, सांताक्रुझ बस डेपो,, सरस्वती रोड,
 • प्रभाग क्रमांक ९८, खुला प्रवर्ग (अलका केरकर,भाजप), नवीन प्रभाग : १०१(नवे आरक्षण : महिला)
  नवीन प्रभाग रचना : जुहू रोड व सरस्वती रोड, सारस्वत रोड, वेलिंग्टन रोड, विठ्ठलदास नगर, गझधरबांध रोड
 • प्रभाग क्रमांक ९९, अनू जमाती प्रवर्ग (संजय अगलदरे,भाजप), नवीन प्रभाग : १०२(नवे आरक्षण : महिला)
  नवीन प्रभाग रचना : खारदांडा, दांडा व्हिलेज गोविंद नगर, कोळीवाडा
 • प्रभाग क्रमांक १००, ओबीसी प्रवर्ग (स्वप्ना म्हात्रे,भाजप), नवीन प्रभाग : १०३(नवे आरक्षण : महिला)
  नवीन प्रभाग रचना : पाली व्हिलेज, पटवर्धन पार्क, युनियन पार्क, पाली हिल, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड व खार पाली रोड
 • प्रभाग क्रमांक १०१, खुला प्रवर्ग (आसिफ झकेरिया,काँग्रेस), नवीन प्रभाग : १०४(नवे आरक्षण : महिला)
  नवीन प्रभाग रचना : वांद्रे तलाव, नॅशनल लायब्ररी, चिंबई व्हिलेज, डॉ. भाभा हॉस्पिटल
 • प्रभाग क्रमांक १०२, महिला प्रवर्ग (मुमताज खान, अपक्ष), नवीन प्रभाग : १०५(नवे आरक्षण : खुला)
  नवीन प्रभाग रचना : संतोष नगर, वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे बस आगार, ओएनजीसी कॉलनी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here