BMC Election 2022 : एफ उत्तर विभागात प्रस्तापितांच्या जागांना धोका, कोण वाढवणार आपल्या जागा

115

शीव, वडाळा अँटॉप हिल आणि माटुंगा या विभागाचा समावेश असलेल्या महापालिकेच्या एफ उत्तर विभागात यंदा ०७ प्रभाग महिला राखीव झाले आहेत. तर तीन प्रभाग खुले झाले आहेत. या महिला आरक्षणाचा फटका विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, युवा सेनेचे पदाधिकारी व माजी समिती अध्यक्ष अमेय घोले, काँगेसचे सुफियान वणू यांना बसला आहे. यातील अमेय घोले यांचे पुनर्वसन शिवसेना नेते आदित्य ठाकरे कुठे करतात हा प्रश्न आहे. तर रवी राजा यांचे पुनर्वसन बाजूच्या प्रभागात होऊ शकेल. पण सातमकर आणि वणू यांना एकतर दुसऱ्या कुठेतरी वार्डात किंवा घरी बसावे लागेल,असे दिसते.

( हेही वाचा : मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक! एक्स्प्रेस गाड्यांचेही मार्ग बदलले 

एफ उत्तर विभागात शिवसेनेचे चार, भाजप तीन आणि काँग्रेसचे तीन असे मागील निवडणुकीत नगरसेवक निवडून आले होते. मागील निवडणुकीत दोन ओबीसी महिला आणि एक ओबीसी असे एकूण ओबीसीचे तीन प्रभाग होते, तर चार प्रभाग खुले आणि दोन प्रभाग महिला व एक प्रभाग अनुसूचित जाती करता राखीव होता. पण नवीन प्रभाग आरक्षणात तीन प्रभाग खुले आणि ०७ प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. मागील निवडणुकीत प्रभाग १७३ हा अनुसूचित जाती करता राखीव झाल्याने सेनेने प्रल्हाद ठोंबरे यांना उमेदवारी दिली होती आणि ते निवडून आले होते. परंतु त्यांचे आकस्मित निधन झाल्याने याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत सेनेचे रामदास कांबळे निवडून आले होते. परंतु हा १७३ प्रभाग नवीन प्रभाग रचनेत १७९ क्रमांकाचा झाला असून तो यावेळेस खुला झाला आहे. त्यामुळे रामदास कांबळे यांना पुढे संधी दिली जाते की मंगेश सातमकर यांना या प्रभागात संधी दिली जाते, याबाबत पक्ष काय निर्णय घेतंय हे महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे हा प्रभाग खुला झाल्याने त्यांना आपल्या जुन्या प्रभागात नशीब आजमवता येईल. परंतु सातमकर यांचीही इच्छा महत्वाची ठरणार आहे. जर त्यांनी नकार दिल्यास कांबळे यांना प्रभागात पुन्हा उभे राहता येईल.

भाजपच्या राजेश्री शिरवडकर, शिवसेनेच्या स्मिता गावकर आणि काँग्रेस च्या पुष्पा कोळी यांचे प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांना धोका नाही. स्मिता गावकर यांना पुन्हा उमेदवारी मिळवताना अडचणी येणार असून याठिकाणी शाखा प्रमुख आग्रही झाल्याने याठिकाणी कोण उमदेवारी मिळवण्यात यशस्वी ठरतात हे पाहावे लागेल.

तर अमेय घोले यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांचा बाजुच्या प्रभागात जावे लागेल. परंतु भाजपच्या नेहल शाह यांचा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्ग झाला असला तरी या प्रभागावरील भाजपची मजबूत पकड लक्षात घेता घोले हे याप्रभागात जाताना शंभरवेळा विचार करतील. तर मागील निवडणुकीत अमेय घोले यांचा केवळ ८६ मतांनी विजय झाला होता. भाजपचे जेसल कोठारी यांचा काठावर पराभव झाला होता. त्यामुळे नेहल शाह यांना आता घोले यांच्या प्रभागात आणि जेसल कोठारी यांना नेहल शहा यांच्या प्रभागात उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जावू शकतो.

भाजपच्या कृष्णा वेणी रेड्डी यांचा प्रभाग खुला झाल्याने आता त्याठिकाणी अनेकांची दावेदारी असू शकते. त्यामुळे रेड्डी यांना प्रसंगी बाजुच्या प्रभागात जावे लागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर महिला राखीव प्रभाग झाल्याने विरोधी पक्षनेते रवी राजा यांना या प्रभागात नशीब आजमावे लागणार आहे.

विभाग : एफ/उत्तर (शीव,वडाळा अँटॉप हिल, माटुंगा)

  • प्रभाग १७२, खुला प्रवर्ग, (राजेश्री शिरवडकर, भाजप) नवीन प्रभाग १७८, आरक्षण : महिला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव किल्ला, शीव तलाव, गांधी मार्केट, माटुंगा पोलिस स्टेशन, श्रध्दानंद रोड,भांडारकर रोड, माटुंगा रेल्वे स्टेशन पादचार पूलपर्यंत
  • प्रभाग १७३, अनुसूचित जाती, (रामदास कांबळे, शिवसेना) नवीन प्रभाग १७९, आरक्षण : खुला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : शास्त्री नगर ए विभाग, सोमय्या कॉलेज, प्रतीक्षा नगर, डॉ. माला गार्डन म्युनिसिपल कामगार वसाहत, सिध्दार्थ नगर, हेमंत मांजरेकर रोडपर्यंत
  • प्रभाग १७४, महिला प्रवर्ग, (कृष्णवेणी रेड्डी- भाजप) नवीन प्रभाग १८०, आरक्षण : खुला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : म्हाडा ट्रान्झिट कॅम्प, वडाळा ट्रक टर्मिनस, वडाळा आरटीओ, विजय नगर, चांदनी नगर, प्रियदर्शनी विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, आदर्श स्कूल,मोनोरेल्वे, आदर्श स्कूल रोड, टाटा पॉवर लाईन नाला पर्यंत
  • प्रभाग १७५, ओबीसी प्रवर्ग, (मंगेश सातमकर, शिवसेना) नवीन प्रभाग १८१, आरक्षण : महिला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : कोकरी आगार, सी जीएस वसाहत सेक्टर ७, मोतीलाल नेहरु नगर,भरणी नाका ते शेख मिस्त्री दर्गा मार्गावरील समाधान रोडपर्यंत
  • प्रभाग १७६, खुला प्रवर्ग, (रवी राजा, काँग्रेस) नवीन प्रभाग १८२, आरक्षण : महिला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : मक्कावाडी, गणेश नगर, कोळीवाडा झोपडपट्टी, जी एस इन्स्टीटयूट ऑफ मॅनेजमेंट, जी.टी.बी नगर, के.डी गायकवाड नगर
  • प्रभाग १७७, महिला प्रवर्ग, (नेहल शाह- भाजप) नवीन प्रभाग १८३, आरक्षण : खुला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : सी.जीअएस कॉलनी सेक्टर ०६, जीएसबी गणपती, खालसा कॉलेज, डॉन बॉस्को हायस्कूल,बाह्मणवाडा, वीर जिजामाता टेक्निकल इंस्टिटयूट, पाच उद्यान परिसर, राजगृह, अग्रवाल नगर, माटुंगा जिमखाना,जे.के.बेसीन रोड, लेडी जहांगीर रोड, टिळक रोड
  • प्रभाग १७८, खुला प्रवर्ग, (अमेय घोले, शिवसेना) नवीन प्रभाग १८४, आरक्षण : महिला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : म्युनिसिपल कृष्ठरोगी रुग्णालय,सीजीएस कॉलनी-वडाळा, आझाद नगर, वडाळा मच्छिबाजार, पारशी जिमखाना, कोहिनूर मिल, कबुतर खाना, स्वामीनारायण मंदिर, दादर सर्कल, नायगाव क्रॉस रोड, मुंबई ग्रंथसंग्रहालय, सर भालचंद्र रोड
  • प्रभाग १७९, खुला प्रवर्ग, (सुफियान वणू, काँग्रेस) नवीन प्रभाग १८५, आरक्षण : महिला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : शेख मिस्त्री दर्गा, काणे नगर (दक्षिण), बीपीटी कॉलनी, नाडकर्णी पार्क, रावजी गणात्रा मार्ग
  • प्रभाग १८०, ओबीसी महिला प्रवर्ग, (स्मिता गांवकर, शिवसेना) नवीन प्रभाग १८६, आरक्षण : महिला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : संगम नगर, दोस्ती आर्केड, शिवशंकर नगर, गणेश नगर, सॉल्ट पॅन रोड, विद्यालंकार कॉलेजमार्ग, भरणीनाका ते शेख मिस्त्री रोड, जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग
  • प्रभाग १८१, ओबीसी महिला प्रवर्ग, (पुष्पा कोळी, काँग्रेस) नवीन प्रभाग १८७, आरक्षण : महिला प्रवर्ग
    नवीन प्रभाग रचना : कोरबा मिठागर,शांतीनगर, खेरा पखाडी, सॉल्ट पॅन रोड, संगम नगर, समाधान रोड
  • सन २०१७ च्या निवडणुकीतील आरक्षण : खुला प्रवर्ग ०४, ओबीसी महिला :०२, ओबीसी :०१, महिला राखीव ०२, अनुसूचित जाती ०१,
    सन २०२२ च्या निवडणुकीतील आरक्षण : खुला प्रवर्ग ०३, महिला राखीव ०७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.