BMC Election 2025 : …तर मुंबईत भाजपाच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा आकडा घटणार!

92
BMC Election 2025 : …तर मुंबईत भाजपाच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा आकडा घटणार!
BMC Election 2025 : …तर मुंबईत भाजपाच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा आकडा घटणार!
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवण्याचे स्वप्न पक्षाकडून पाहिले जात असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईत हे स्वप्न साकार होण्याची शक्यता धुसर वाटत आहे. त्यामुळे सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने ८२ नगरसेवक निवडून आणले असले तरी आगामी निवडणुकीत एवढाही आकडा पार करता येणे शक्य होणार नाही. भाजपाला मुंबईत सर्वांधिक नगरसेवक निवडून आणण्याची संधी असली तरी हाती सत्ता आल्यानंतर आपल्या माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याकडे होणारा दुर्लक्ष हाच यासाठी कारणीभूत ठरेल असे बोलले जात आहे. (BMC Election 2025)

(हेही वाचा- शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule)

लोकसभेत मुंबईत उबाठा शिवसेनेचे ३ आणि काँग्रेसचा २ याप्रमाणे महाविकास आघाडीचे ४ आणि शिवसेना व  भाजपाचे प्रत्येक एक खासदार निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत भाजपाचे १५ आमदार निवडून आले तर त्याखालोखाल उबाठाचे १० आणि शिवसेनेचे ०६ आणि काँग्रेस ०३, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि सपाचा एक आमदार निवडून आले. मात्र,मुंबईत विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीनंत राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर जनतेच्या भाजपाकडील अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. (BMC Election 2025)

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचा विचार केल्यास त्यांच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी घरोघरी जावून प्रचार केला आणि त्यात त्यांच्याकडे ज्या समस्या जनतेने तथा मतदारांनी मांडले, ते प्रश्न आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी हे कामाला लागले असले तरी त्यांची कामे महापालिकेतील अधिकारी करत नाहीत. नगरसेवक नसल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांची गिनती करणे आणि त्यांना प्रतिसाद देणे बंद केले आहे. तसेच या नगरसेवकांची कामे काही आमदार मग ते स्व: पक्षातील असो वा विरोधी पक्षातील असो ते हायजॅक करत  आहेत. तर काही आमदार माजी नगरसेवकांची कामे होणार नाही याची काळजी घेताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी हे पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहेत, पण त्यांच्याकडूनही त्यांना प्रतिसाद मिळत नाही. राज्यात सरकार असल्यामुळे आपल्या विभागातील समस्या ज्या ज्या खात्याशी संबंधित आहेत त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत,त्यांनाही मंत्री भेटत नाही. तसेच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांच्या मंजुरीने  कामे करण्यास मुभा दिली होती, त्यात काही नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांना मंजुरी देण्यात येत होती, ती पध्दतही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केली. किंबहुना ते महापालिकेच्या कामकाजात अधिक लक्ष घालत नाही. परिणामी राज्यात सरकार असूनही भाजपाच्या माजी नगरसेवकांची कामे होत नसल्याने जनतेच्या रोषाचे त्यांना धनी व्हावे लागते. राज्यात आणि केंद्रात तुमची सत्ता असूनही जर तुम्ही काम करणार नसाल तर उपयोग काय तुम्हाला निवडून देण्याचा असे शब्द माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना ऐकवले जात आहे. (BMC Election 2025)

(हेही वाचा- ऐतिहासिक वाघनखे नागपुरात! Devendra Fadnavis यांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचं उद्घाटन)

एकीकडे शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासाठी भरीव निधीची तथा त्यांची कामे पक्षाचे नेते, मंत्री करत असल्याने लोकांमध्ये अजूनच संभ्रम निर्माण होत आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेची सत्ता आहे, पण शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या विभागांत काम करत आहे, पण भाजपाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची कामे होत नसल्याने हा संभ्रम अधिक वाढला आहे. शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार हे आपल्या विभागांमध्ये विशेष लक्ष देत आहेत, या तुलनेत भाजपाचे मंत्री आपल्याच पक्षाच्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या कामांना गती देत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (BMC Election 2025)

सरकारमध्ये असल्याचा फटका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना बसत असला तरी उबाठा शिवसेना आणि काँग्रेस हे विरोधी पक्षांत असल्याने लोकांकडून त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली जात नाही. उलट त्यांचे खासदार आणि आमदार हे काम करत असल्याने भाजपाची खालची फळी आता विकासकामांमध्ये कमकुवत ठरताना दिसत आहे. याचा फायदा शिवसेना, उबाठा शिवसेना आणि काँग्रेस घेण्याची शक्यता आहे. (BMC Election 2025)

(हेही वाचा- “महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, AK47 हातात घेत Ajit Pawar यांची मिश्किल टिप्पणी)

सन  २०१७मध्ये निवडून आल्यावर पहारेकरी म्हणून बसल्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांचे प्रचंड नुकसान झाले, त्यानंतर २०१९मध्ये विरोधी पक्षात बसूनही काही कामे होवू शकली नाही, पुढे कोविड आणि आता २०२२ पासून सत्ता आल्यानंतर शिवसेनेची कामे झाली पण भाजपाच्या नगरसेवकांना काहीच निधी मिळाला नाही, त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर आशा पल्लवित झाल्या होत्या, पण फडणवीस हे महापालिकेत लक्ष घालत नसल्याने तसेच मंत्रीही आपल्याच माजी नगरसेवकांची व पदाधिकाऱ्यांची कामे करत नसल्याने भाजपाने जो ८२ नगरसेवकांचा आकडा पार केला होता, तेवढाही आता गाठणे शक्य होणार नाही. त्यामुळे भाजपाला आगामी निवडणूक लक्षात घेता मुंबईतील आपल्या सर्व माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांच्या कामांची दखल घेऊन सक्रीय राहणे आवश्यक असेल,अन्यथा महापालिकेवरील भगवा फडकवण्याची स्वप्न भंग पावेल असेच खासगी पक्षातूनच ऐकायला मिळत आहे.  (BMC Election 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.