BMC Election : शिवसेना महानगरपालिका निवडणुकीत उबाठाला आणखी धक्का देणार ?

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी

139
BMC Election : शिवसेना महानगरपालिका निवडणुकीत उबाठाला आणखी धक्का देणार ?
  • प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने अनेक ठिकाणी मजबूत उमेदवारांची निवड केली असून, उबाठाच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई महानगरपालिकेसहित इतर महानगरपालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून मजबूत उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. इतर पक्षांमधून तसेच उबाठामधून देखील उमेदवार आपल्या गटात सामील करून घेण्याची कवायत सुरू झाली आहे. (BMC Election)

(हेही वाचा – इस्लामी राजवटीला विरोध करणाऱ्यांना संपवणार; Khilafah Conference च्या पोस्टमध्ये चिथावणीखोर भाषा)

महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सक्रियपणे सभा घेतल्या जाणार असून, स्थानिक पातळीवरील नेत्यांशी संपर्क वाढवला जाणार आहे. तसेच, काही विद्यमान नगरसेवक आणि कार्यकर्ते शिवसेनेत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे उबाठाला रणनीती बदलावी लागू शकते. (BMC Election)

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy : ‘तुम्ही काय करत होता?’ गावस्करांनी उपटले प्रशिक्षकांचे कान)

या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे. निवडून आलेल्या आमदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिका निवडणुकीत कोणता गट वरचढ ठरेल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. (BMC Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.