किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ! महापालिकेकडून मोठी कारवाई

137

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांचे मुंबईतील गोमाता नगरमधील घर आणि कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. गोमाता नगरमधील घर आणि कार्यालय मुंबई मनपाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

( हेही वाचा : मुंबई ते गोवा मार्गावर ‘शिवशाही’ प्रवास! एसटी महामंडळाकडून प्रवाशांना नववर्षाचे गिफ्ट… )

‘पेडणेकर को हिसाब देना पडेगा’ – किरीट सोमय्या

वरळी एसआरए प्रकल्पातील गाळे किशोरी पेडणेकर यांनी हडपले, त्यांनी घुसखोरी करून घराचा ताबा घेतला याबाबत दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. पेडणेकर यांनी १० वर्षांहून अधिक काळ बेकायदेशीरपणे सदनिकांवर कब्जा केला असा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच पेडणेकर को हिसाब देना पडेगा असेही किरीट सोमय्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, सदरची सदानिका एसआरएने गंगाराम बोगा यांना वितरित केली होती. या सदनिकेचा वापर बोगा यांनी करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ही सदनिका पेडणेकर यांना राहण्यास दिल्याची माहिती पेडणेकर यांनी नामनिदर्शेन पत्रासह मुंबई महापालिकेला दिल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बोगा यांनी एसआरएच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा अहवाल सहकार विभागाने एसआरए अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार सक्षम प्राधिकारी यांना महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ च्या कलम ३ (ई) अन्वये कारवाई करावी, असे एसआरएने पालिकेच्या जी दक्षिण विभागाला पत्राद्वारे कळवले होते. यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.