भाजपाच्या सदस्यांविना होणार आरोग्य समितीची बैठक!

76

नायर रुग्णलयामध्ये वरळीतील जळीत कुटुंबावर उपचार करण्यास दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांचा निषेध करण्यासाठी आरोग्य समितीतील भाजपच्या सर्व सदस्यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या सर्व सदस्यांच्या राजीनाम्याची पत्रे समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली असून, प्रथमच भाजपच्या सदस्यांविना आरोग्य समितीची बैठक पार पडणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य समितीची बैठक गुरुवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर भाजपचे आरोग्य समिती सदस्य प्रकाश मोरे, सुनिता मेहता, अनिता पांचाळ, नील सोमैया,  योगिता कोळी,  हर्षिता नार्वेकर, सारीका पवार,  बीना दोशी, प्रियंका मोरे, बिंदू  त्रिवेदी, राजुल देसाई आदी नगरसेवकांच्या आरोग्य समिती सदस्यत्वाच्या राजीनाम्याची पत्र मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे.

प्राथमिक उपचार दिले नाहीत ही दुर्दैवी बाब

यासर्व सदस्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नायर रुग्णालयातील त्या घटनेबाबत चिंता व्यक्त करत हे  राजीनामे दिले होते. आपण ज्या समितीचे सदस्य आहोत, त्या आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा नाही किमान प्राथमिक उपचारही त्यांना करता आले नाही हे दुदैवी बाब आहे. त्यामुळे अशा समितीत आपण राहणे योग्य नाही, म्हणून त्यांनी राजीनामे दिले होते. युवराजांच्या हट्टापोटी भारतीय प्राणी व पक्षी सोडून परदेशी पेंग्विनवर दररोज दीड लाखांचा खर्च करणाऱ्या सत्ताधारी पक्षाला या बालमृत्यूचे सोयरसुतक नसल्याचेही म्हटले आहे.

( हेही वाचा : महापौर कार्यालय! मुक्काम पोस्ट राणीबाग निवासस्थान की महापालिका मुख्यालय? )

भाजपच्या सर्व सदस्यांनी  दिलेली राजीनामा पत्रे आरोग्य समितीच्या बैठकीपुढे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सभेमध्ये याला मंजुरी दिल्यास यापुढे आरोग्य समितीचाही एकही सदस्य समितीच्या बैठकीत प्रतिनिधीत्व करताना दिसणार नाही. त्यामुळे प्रथमच भाजपच्या सदस्यांविना ही आरोग्य समितीची बैठक होणार असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.