भाजप नेत्याला मुंबई महापालिकेकडून २४ तासांत १४ नोटीस!

151

महाराष्ट्रात सध्या सुडाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात बोलणा-या भाजपाच्या नेत्याला कारवाईला सामोरे जावे लागत आहे. नुकतचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावरच्या कारवाईनंतर आता भाजपाचे नेते मोहित कंबोज यांना मुंबई महानगरपालिकेने 24 तासांत तब्बल 14 नोटीस् पाठवल्या आहेत. कंबोज यांच्या मालकीची कार्यालयं आणि रेस्टाॅरंटन्सना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

पालिकेकडून घराची पाहणी

मागील काही दिवसांपासून मोहित कंबोज आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. कंबोज यांनी महाविकास आघाडीतील नेते संजय राऊत आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. महाविकास आघाडीवर टीका करणारे कंबोज हे आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने मोहित कंबोज यांना नोटीस बजावल्या आहेत. 23 तारखेला त्यांच्या घराची पाहणी केली जाणार आहे. त्यांच्या घरात काही बेकायदा बांधकाम झाले आहे का, याची पाहणी पालिका अधिकाऱ्यांचे पथक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

( हेही वाचा :झपाट्याने विकसीत होणारी महामुंबईच सर्वाधिक प्रदूषित! )

काहीही करा पण मी झुकणार नाही

घरं , कार्यालयं आणि रेस्टाॅरंटला बजावण्यात आलेल्या नोटीशीनंतर मोहित कंबोज यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीसमोर झुकणार नसल्याचं कंबोज यावेळी म्हणाले. खोटा गुन्हा दाखल करू शकला नाहीत, म्हणून माझ्या घरी मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. कंगना रनौत असो किंवा नारायण राणे…त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकले नाहीत, तर आता घर तोडायचे. काही हरकत नाही. काहीही करा, पण महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही, असंही कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.