सभागृह नेत्यांबरोबर फाटल्यानंतर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष एकत्र

पक्षाकडून कानउघडणी केल्यानंतर नालेसफाईच्या कामांमध्ये हे तिन्ही महापालिकेतील नेते एकत्र आल्याचे पहायला मिळाले.

90

मुंबईत आजवर एकला चलो रे याप्रमाणे कारभार करणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आता स्थायी समिती अध्यक्षांशी जूळवून घेतल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सभागृह नेत्यांशी फाटल्यामुळे महापौरांनी स्थायी समिती अध्यक्षांसोबत जुळवून घेतल्याचे पहायला मिळते. महापौरांनी, गुरुवारी यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरच्या वाटपासाठी भेट दिली. महापौर प्रथमच अशाप्रकारे स्थायी समिती अध्यक्षांसोबत दिसल्याने, निवडणुकीच्या शेवटच्या वर्षात विरुध्द दिशेला असलेल्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष एकत्र येत काम करताना दिसत आहेत.

तिन्ही नेते एकत्र

मुंबई महापालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांचे सूत जुळून आल्याचे दिसून येत नव्हते. त्यामुळे तिघांची तोंडे विरुध्द दिशेला असल्याचे मागील काही वर्षांपासून पहायला मिळत आहे. परंतु मागील दोन दिवसांपूर्वी प्रथम हे महापालिकेतील शिवसेनेचे हे तिन्ही नेते एकत्र आलेले पहायला मिळाले. पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या पाहणीसाठी हे तिन्ही नेते एकत्र आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी महापौरांनी भेट देत ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरच्या वाटपात भाग घेतला. या दोघांना एकत्र आणण्याचे काम तळेरे गावचे सुपुत्र विशाल कडणे यांनी केले आहे. विशाल कडणे हे गरीब गरजूंना ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरचे वाटप करत आहेत. भायखळ्यातील अशाच एका गरीबाला ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरचे वाटप महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव आणि शिवसेना उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

(हेही वाचाः मुंबई महापालिकेतील शिवसेना नेत्यांचे मेतकूट जमले!)

पक्षाकडून कानउघडणी

मुंबईतील दादरमधील पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाला महापौरांना डावलण्यात आले होते. या उद्घाटनानंतरच शिवाजी पार्क मैदानाच्या सुशाोभीकरण कामाच्या भूमीपुजनाचाही कार्यक्रम आटोपून घेण्यात आला होता. पण त्याही कार्यक्रमाला महापौरांना बाजूला करण्यात आले होते. त्यामुळे सभागृह नेत्यांच्या विरोधात महापौर असे चित्र दिसून आले. परंतु त्यानंतर पक्षाकडून कानउघडणी केल्यानंतर नालेसफाईच्या कामांमध्ये हे तिन्ही महापालिकेतील नेते एकत्र आल्याचे पहायला मिळाले. त्यानंतरच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष हे एकत्र आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.