महापालिकेचा आदित्योदयाचा संकल्प : यंदा ४५,९४९ कोटींचा अर्थसंकल्प

130

मुंबई महापालिकेच्या सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. यंदा महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी पक्षाचे निवडणूक अर्थसंकल्प सादर करताना सुमारे सात हजार कोटींची वाढ करत ४५ हजार ९४९ पूर्णांक २१ कोटींचा असा ८ पूर्णांक ४३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प हा राज्याचे पर्यावरणमंत्री यांच्यासाठी आगामी निवडणुकीची वातावरणपूरक बनवताना आदित्योदयाचा संकल्पच मांडत त्यांच्या संकल्पेनतील उपक्रम, योजना आणि विकासकामांसाठी भरीव तरतूद महापालिका आयुक्तांनी केल्याचे पहायला मिळत आहे.

मागील वर्षी ११.५१ कोटी रुपये शिलकीचा ३९ हजार ०३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. परंतु यावेळी त्यामध्ये ८.४३ कोटी रुपये शिलकीचा ४,५४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडताना आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिकेच्या महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या ३१ प्रकल्पांसाठी १७ हजार ९४२ कोटींची तरतूद केली आहे. महापालिकेच्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी याकरता हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र आपल्या घराशेजारी ही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा चहल यांनी केली आहे. या उपक्रमासाठी सुमारे ४०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांना घराशेजारी प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाइन नाही तर प्रत्यक्ष सभेत: निर्णय बदलण्याची आयुक्तांवर नामुष्की)

शिव योग केंद्र : योगाद्वारे चांगले आरोग्य

आजार झाल्यानंतर उपचारात्मक उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याच्या दृष्टीकोनातून शिव योग केंद्रासारखे उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत.

प्रोटॉन थेरपी

कर्करोगावरील उपलब्ध अद्ययावत उपचार प्रणालीपैकी एक प्रोटॉन थेरपी या सुविधेची उभारणी टाटा कर्करोग रुग्णालय यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचेही आयुक्तांनी जाहीर केले आहे.

पर्यावरण खात्याचा एक भाग म्हणून हवामान कृती कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध खात्यांना हवामान कृती आराखड्याकरता संबंधित खात्याच्यावतीने पुरेशी तरतूद करण्यात आली असल्याचेही आयुक्तांनी आपल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे.

महत्वाचे प्रकल्प, योजना व उपक्रमांची घोषणा

  • महापालिकेच्या जकात नाक्यांवर परिवहन आणि व्यवसायिक केंद्राची उभारणी
  • गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी मराठी नाट्य विश्व संग्रहालय
  • घाटकोपरमध्ये कर्मवारी भाऊराव पाटील वेल्फेअअर सेंटर
  • वरळीच्या धर्तीवर उपनगरात विक्रोळीत इंजिनिअर हब
  • रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी टनेल धुलाई केंद्र

(हेही वाचा महापालिकेच्या शाळांमधून वन्यजीव आणि जैवविविधतेची आता माहिती : शिक्षण विभागासाठी यंदा ३,३७० कोटींची तरतूद)

कोणत्या प्रकल्पांसाठी कितीची तरतूद ते पहा

  • बेस्ट उपक्रमाला ८०० कोटींचे अर्थसहाय्य
  • कोस्टल रोड प्रकल्पांसाठी ३२०० कोटी रुपये
  • गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १३०० कोटी रुपये
  • मिठी नदीचे पुनरुज्जीव आणि पूर नियंत्रण करता ५६५.३६ कोटी रुपये
  • दहिसर,पोईसर, ओशिवरा अणि वालभट नद्यांचे पुनरुज्जीवन करता २०० कोटी रुपये
  • सफाई कामगारांच्या आश्रय योजनेसाठी १४६०.३१ कोटींची तरतूद
  • उद्यान विभागासाठी १४७.३६ कोटी रुपयांची तरतूद
  • वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाकरता ११५.४६ कोटींची तरतूद
  • मुंबई अग्निशमन दलाकरतमा ३६५.५४ कोटींची तरतूद
  • समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाकरता २०० कोटींची तरतूद
  • बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा प्रकल्पांतील ऊर्जा प्रकल्पासाठी १० कोटींची तरतूद
  • पाणी पुरवठा प्रकल्पांकररता १०५९.६६ कोटींची तरतूद
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.