मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाइन नाही तर प्रत्यक्ष सभेत: निर्णय बदलण्याची आयुक्तांवर नामुष्की

152

मुंबई महापालिकेच्या सन २०२२-२३चा अर्थसंकल्प गुरुवारी मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प ऑनलाइन प्रणालीद्वारे मांडला जाणार होता. परंतु बुधवारी रात्री उशिरा हा निर्णय रद्द करून शिक्षण व स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष घेत हा अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्तांवर  ऐनवेळी ही सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष घेण्याची नामुष्की का आली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेचा २०२२-२३चा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांना तर आयुक्त इक्बाल सिंह चहल हे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर करणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच हा अर्थसंकल्प थेट सभा न घेता ऑनलाईन सभेद्वारे मांडण्याचा जाणार होता. शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प शिक्षण समितीच्या बैठकीत सकाळी दहा वाजता आणि मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत अकरा वाजता मांडला जाणार आहे.

भाजप न्यायालयात जाणार होता

आजवर प्रत्यक्ष सभेत सादर केला जाणारा हा अर्थसंकल्प ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर केला जात असल्याने एक प्रकारे टीकेची झोड उठली होती. एकीकडे मुंबईसह राज्यात सर्व शाळा या खुल्या करण्यात आल्याा आहेत. मुलं शाळेत जाऊन शिक्षण घेत आहेत. मात्र दुसरीकडे मोजक्याच नगरसेवकांच्या उपस्थितीत आयुक्तांना हा अर्थसंकल्प ऑनलाइन मांडावा लागतो. त्यामुळे या ऑनलाईन प्रणाली द्वारे सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्प विरोधात भाजपने न्यायालयाचे दार ठोठावण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे आयत्या वेळी गडबड नको म्हणून आयुक्तांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय मागे घेत हा अर्थसंकल्प प्रत्यक्ष बैठकीत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी शिक्षण व स्थायी समितीची बैठक ही प्रत्यक्ष होणार असून त्यात आता सदस्यांच्या उपस्थित हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.