महापालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला बोगस! अतुल भातखळकरांचा आरोप

तोक्ते चक्रीवादळात शहरातील छोट्या-मोठ्या रस्त्यांवर झाडे पडली. वादळानंतर चोवीस तासानंतरही उन्मळून पडलेली झाडे महापालिकेने उचलली नाहीत. त्यामुळे सोसायटी कंपाऊंड, छोटे रस्ते, वाहनांचे मोठे नुकसान झाले, असे भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले. 

79

‘तोक्ते’ वादळामुळे मुंबईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबद्दल राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेने चकार शब्द काढलेला नाही. महापालिकेचा एकतर्फी गाडा हाकणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही याबाबत तातडीने पावले उचलली नाहीत. त्यामुळे शहरातील तुंबलेल्या पाण्याचा निचरा व्हायला आठ ते दहा तास लागले. शिवसेनेचा नालेसफाईचा दावा बोगस असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदारच नेमला नाही!

तोक्ते चक्रीवादळात शहरातील छोट्या-मोठ्या रस्त्यांवर झाडे पडली. वादळानंतर चोवीस तासानंतरही उन्मळून पडलेली झाडे महापालिकेने उचलली नाहीत. त्यामुळे सोसायटी कंपाऊंड, छोटे रस्ते, वाहनांचे मोठे नुकसान झाले. याला सत्ताधारी शिवसेना सर्वस्वी जबाबदार आहे. महापालिकेत १८ मार्चला वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्तीचा प्रस्ताव येऊनही हे कंत्राट वृक्ष प्राधिकरण समितीने मंजूर केले नाही. झाडे पडून दोनशेहुन अधिक जणांचा मृत्यू झाला. मार्चमध्ये वेळीच वृक्ष छाटणी झाली असती तर दोन जणांना जीव गमवावा लागला नसता. वृक्ष छाटणीचे हे कंत्राट कोणी अडवले? का अडवले? याची चौकशी करून संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली. इतर राज्यांनी वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने मदत जाहीर केली. त्याप्रमाणे महानगरपालिकेने येत्या २४ तासात वॉर्ड ऑफिसकडून पंचनामे करून नुकसान झालेल्या नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी असेही आमदार भातखळकर यावेळी म्हणाले.

(हेही वाचा : मुंबईत २,३६४ झाडे पडण्यामागे वादळासह आणखी कोणते होते कारण? )

ग्लोबल टेंडरमध्ये राजकारण!

लसीकरणाबाबत महापालिकेत गोंधळ सुरू असून सेव्हन हिल्स रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील बोगस फ्रन्टलाइन वर्कर दाखवून लसीकरण केले जात आहे. अनेक सिनेअभिनेते सरकारच्या खोट्या पीआरमध्ये सहभाग घेत आहेत. त्यामुळे अनेक अभिनेते, त्यांचे ड्रायव्हर, कुटुंबीय यांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने लसीकरण केले जात आहे. याची राज्य सरकारने चौकशी केली नाही, तर आम्ही केंद्रीय आरोग्य खात्याकडे तक्रार करून लसीकरणातील काळाबाजार उघडकीस आणू. त्याचबरोबर ड्राइव्ह इन सेंटर लसीकरण मोहिमेचाही फज्जा उडाला असून यातून महापालिकेची घिसाडघाई दिसून आली आहे. ग्लोबल टेंडरमध्ये राजकारण असल्याचा आरोप आमदार भातखळकर यांनी केला. त्याचबरोबर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण महापालिकेच्या पैशातून करण्याची मागणी त्यांनी केली. पक्षीय हित न पाहता ग्लोबल टेंडर खऱ्या अर्थाने अमलात आणावे, असा टोला आमदार भातखळकर यांनी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, नगरसेवक अतुल शहा, विवेकानंद गुप्ता उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.