महापालिका आयुक्तांनी मानले राज्याचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांचे विशेष धन्यवाद…

122

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय निवेदनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नामोल्लेख करत त्यांच्याकडून मिळालेल्या सहका-याबद्दल विशेष धन्यवाद मानले आहे. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी अत्यावश्यक औषधे आणि प्राणवायुच्या साठ्यासाठी मोठ्या टाक्यांची आयात करणे या उपाययोजना करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. हे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘एक मुंबईकर’ यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो असे त्यांनी म्हटले.

मालमत्ता कर, हॉटेल उद्योग व बेस्टला दिलासा 

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्री हे नागरीकांच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी सदैव कार्यरत असून त्यांनी कोविड महामारीच्या अत्यंत आव्हानात्मक काळात मुंबई महानगरपालिकेतील आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी स्थावर मालमत्ता क्षेत्राला अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरीकांना मालमत्ता करातून पूर्ण सूट देऊन दिलासा दिला आणि हॉटेल उद्योग व बेस्टला सुध्दा दिलासा दिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

‘धारावी मॉडेल’ची दखल घेतली

कोविड व्यवस्थापन मॉडेल हे एकमेवाद्वितीय आणि पूर्ण विचाराअंती पार पाडलेल्या विविध कार्यवाहीचा आदर्श नमुना ठरला आहे. मुंबई महानगरपालिकेने कोविड महामारी दरम्यान केलेल्या व्यवस्थापनाचे सर्वोच्च न्यायालय, तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही कौतुक केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही आपल्या ‘धारावी मॉडेल’ची दखल घेतली, तसेच विविध आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे व इतर माध्यमांनीही मुंबई महानगरपालिकेच्या कोविड व्यवस्थापनावर लिहिले आहे आणि आपण कोविड महामारीमध्ये दिलेल्या वेगवान व व्यावसायिक प्रतिसादाची अनेक बातम्याद्वारे प्रशंसा केली गेली. अत्यंत व्यावसायिकपणे केलेल्या प्राणवायू व्यवस्थापनाही सर्वच स्तरांतून कौतुक केले गेले. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या जिवित रक्षणासाठी अत्यावश्यक औषधे आणि प्राणवायुच्या साठ्यासाठी मोठ्या टाक्यांची आयात करणे या उपाययोजना करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

संमिश्र वीज खरेदी करण्यासाठी वीज खरेदी करार

मुंबई महानगरपालिकेला पर्यावरणीय जबाबदाऱ्यांचीही पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच नवनवीन संक्रमण आणि आकस्मिक बदलांमुळे होणारी पर्यावरणाची मोठी हानी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका बदलांची सौम्यता, बदलांचा स्वीकार, कार्बनच्या उत्सर्जनावर अंकुश, कार्बन उत्सर्जनाचा समतोल यावर काम करणे चालू आहे. आम्ही विविध क्षेत्रांमध्ये कार्बनचा समतोल राखण्यावर लक्ष केंद्रित करणार असून याची सुरूवात म्हणून मुंबई महानगरपालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पासाठी हायड्रो आणि सौर अशी १०० मेगा वॅट समिश्र वीज खरेदी करण्यासाठी वीज खरेदी करार केला आहे.

मुंबई महानगरपालिका ‘नेट झिरो’चे उद्दिष्ट गाठेल

मुंबई महानगरपालिका अनेक सार्वजनिक वाहनतळांमध्ये खाजगी सहभागाने इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशनचा सक्रियपणे प्रचार करत आहे. विविध भागात आपली मियावाकी जंगल, इलेक्ट्रिक बसेस तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ई-वाहनांचा अवलंब ही नजिकच्या भविष्यात कार्बन समतोल राखण्याच्या दिशेने लहान पण ठोस पावले उचलली आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ०२ ऑक्टोबर, २०२० रोजी उद्घाटन केलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या मार्गदर्शनाखाली ध्येयाधिष्टित हवामान कृती आराखडा राबवून सी ४० शहरांचा एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिका आपले कर्तव्य बजावेल. तेव्हापासून बृहन्मुंबई महानगरपालिका भूमी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पाच घटकांचा समावेश करुन शाश्वत पर्यावरणाच्या दिशेने गतीशील आणि प्रमाणबध्द उपाययोजना करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करीत आहे. या उद्दीष्टासाठी स्थापलेला हवामान कृती आराखडा कक्षाद्वारे मुंबई महानगरपालिका या सर्व घटकांवर एकत्रितरित्या काम करीत आहे. लवकरच मुंबई महानगरपालिका ‘नेट झिरो’चे उद्दिष्ट गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

रस्ते खाते आणि पूल खात्यामार्फत बांधलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते

या वर्षापासून पुढेही मुंबई महानगरपालिका मुंबईच्या नागरिकांना दर्जेदार जीवनमान देण्या बरोबरच सुसह्य जीवनशैली मिळावी यावर लक्ष केंद्रित करणार आहे. चालण्यासाठी सोयींमध्ये वाढ करण्यासाठी रस्ते, पदपथ आणि सामुदायिक जागा या संदर्भात अभ्यास करुन पुनःश्च काम करण्याकरिता तालिका तयार करण्यास सुरूवात केली आहे. स्त्रिया आणि मुले यांच्यासह नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी ज्या जागांमध्ये पथदिव्यांची जास्त आवश्यकता असेल तेथे जास्तीचे पथदिवे उभारुन रस्त्यावरील सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात येईल. रस्ते खाते आणि पूल खात्यामार्फत बांधलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते आणि नवीन पूल यामुळे शहरातील प्रवास सुलभता सुधारेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.