पोलिसांनी सोडले घरी आणि महापालिका आली दारी! राणा दाम्पत्यामागील शुक्लकाष्ट संपेना 

98
मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याच्या मागे जे शुक्लकाष्ट लागले आहे, ते संपता संपेना. पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या ज्या खार येथील निवासस्थानी बंदिस्त करून नंतर अटक केली. पुढे २ आठवडे कारागृहात घालवल्यावर त्यांना जामीन मिळाला. मात्र त्याचवेळी मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याच्या खार येथील घरावर नोटीस बजावली आहे.
bmc notice

घराची पाहणी करणार 

पोलिसांनी राणा दाम्पत्याना जामीन दिल्यावर खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. तर आमदार रवी राणा आता पत्नीच्या प्रकृतीत व्यस्त झाले आहेत. अशा वेळी मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याच्या घराच्या दारावर नोटीस बजावली आहे. राणा यांच्या घराच्या मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम झाल्याचे तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली आहे. त्यानुसार पालिकेचे अधिकारी याबाबतची पाहणी करणार आहेत. पालिकेच्या खार वार्ड कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून ही पाहणी होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.