महापालिकेच्या रद्दीला मिळाला तिप्पट दर!

142

मुंबई महापालिकेची ओळख श्रीमंत महापालिका म्हणून असली तरी या महापालिकेत निर्माण होणाऱ्या रद्दीलाही तेवढीच चांगली मागणी आहे. महापालिकेत निर्माण होणाऱ्या रद्दीलाही चांगला भाव मिळत असून महापालिकेने बांधलेल्या अंदाजापेक्षा तिप्पट भाव रद्दीला मिळाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे दहा रुपये किलो दराने विकायला निघालेल्या महापालिकेच्या रद्दीला ३० रुपये देण्यासाठी संस्था पुढे आल्या आहेत.

३६ रुपयांमध्ये रद्दी खरेदी करण्याची तयारी दर्शवली

मुंबई महापालिकेच्या विविध कार्यालयांमधील रद्दी कागदांची विक्री व उचलून नेण्यासाठी प्रशासनाच्यावतीने निविदा मागवल्या होत्या. यामध्ये जुनी पावती पुस्तकांसहित जुनी निरोपयोगी कागदपत्रे, जुनी वर्तमानपत्रे, पाक्षिके व मासिके, रद्दी पेपर, कागदांच्या गुंडाळ्या, कचऱ्याच्या टोपलीतील कागद, महापालिकेच्या विविध शाळांमधील वापरलेल्या जुन्या उत्तरपत्रिका,खात्यांची जुनी पावती पुस्तके, बॉक्सेस तसेच अखंडित लेखन साहित्यांची रद्दी आदींकरता मागवलेल्या निविदांमध्ये सुमारे ८ रुपये ३० पैशांपासून ते १५ रुपयांमध्ये अंदाजित किलोचा दर निश्चित करण्यात आला होता. त्या तुलनेत बोली लावणाऱ्या संस्थांनी १५ रुपयांपासून ते ३६ रुपयांमध्ये रद्दी खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

(हेही वाचा पाटणमध्ये लव्ह जिहाद; वासनांध मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदू मुलीला मारहाण करत लैंगिक अत्याचार )

३६ रुपये एवढा भाव देऊ केला

यामध्ये जुनी पावती पुस्तके आणि जुनी निरुपयोगी कागदपत्रांसाठी एका किलोसाठी सुमारे ११ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता, त्यातुलनेत या रद्दीसाठी प्रति किलोसाठी ३५ रुपयांचा भाव संस्थेने देऊ केली आहे, तर जुनी वर्तमान पत्रे व पाक्षिक, साप्ताहिक आाणि मासिकांच्या प्रति किलोकरता साडे तेरा रुपयांचा दर निश्चित केला होता, तिथे संस्थेने दुपटीपेक्षा जास्त अर्थात २९ रुपयांचा भाव देऊ केला आहे. तर मुद्रणालयातील अर्थात प्रिटींग प्रेसमधील कात्रणे गुंडाळलेले रद्दी पेपर व वापरलेल्या कागदांच्या गुडाळ्यांकरता प्रति किलोसाठी सुमारे ११ रुपयांचा दर निश्चित केला होता, तिथे संस्थेने ३६ रुपये एवढा भाव देऊ केला आहे.

तिजोरीत ३६ रुपये एवढा भाव देऊ केला

त्यामुळे अंदाजित दरापेक्षा २२२, २३१ टक्के दराने अधिक भाव देण्यासाठी संस्थांनी बोली लावल्यामुळे महापालिकेने युनिक एजन्सीने पुढील दोन वर्षांसाठी सुमारे ७० लाख रुपये आणि गरीब नवाज या संस्थेला ८२ हजारांची रद्दी खरेदी करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या गरीब नवाज या संस्थेला जुनी वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके व मासिकांची २,५६६ किलो आणि पूर्व मुद्रीत अखंडित लेखनसामग्रीची रद्दी २५० किलो यासाठी सुमारे ८२ हजारांचे रद्दी खरेदीचे कंत्राट दिले आहे, तर उर्वरीत कंत्राट हे युनिक एजन्सीला देण्यात आले आहे. त्यामुळे या रद्दी विक्रीतून महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ७१ लाख रुपये जमा होणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.