घाटकोपर येथील मृत मुलीच्या कुटुंबियांचे महापौरांनी केले सांत्वन

घाटकोपर येथील पंधरा वर्षीय मुलीचा लसीकरणाने मृत्यू झाल्याचे आरोप करणारे वृत्त व छायाचित्र समाजमाध्यमांमध्ये पसरल्यानंतर, त्याबाबतची वस्तुस्थिती आणि सत्यता जाणून घेण्यासाठी तसेच मृत मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी १५ जानेवारी २०२२ रोजी घाटकोपर येथे संबंधित कुटुंबियांच्या घरी भेट दिली.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

पंधरा वर्षीय आर्या नामक मुलीचा कोविड लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचे आरोप करणारे वृत्त समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित मुलीच्या कुटुंबीयांची घाटकोपर येथील निवासस्थानी भेट घेतली. या कुटुंबियांना धीर दिला तसेच सांत्वनही केले. याप्रसंगी आमदार दिलीप लांडे, नगरसेवक किरण लांडगे, एस विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्रभारी) महादेव शिंदे आदी उपस्थित होते.

(हेही वाचा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच इंग्रजी पाट्यांची दुकाने!)

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतांना महापौर किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या की, कु. आर्या हीच्या आजोबांनी सांगितले की, लसीकरणामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झालेला नाही. अभ्यासाचा तिने अतिताण घेतल्याने ते असह्य होवून, हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू ओढवला आहे. ह्या दुःखद प्रसंगी कोणीही यामध्ये राजकारण आणता कामा नये, असे आवाहनही महापौरांनी केले आहे. १५ ते १८ वयोगटातील मुले संक्रमित होऊ नये, यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आर्याचे छायाचित्र आणि वृत्त ज्या पद्धतीने समाज माध्यमांवर पसरविण्यात आले आहे, ते सर्व बनावट समाजमाध्यम खात्यांवरून आणि गैर हेतूने केले जात असल्याचे सहज लक्षात येते. ही मंडळी आर्याच्या कुटुंबीयांना धीर न देता, या म आहेत. तसेच त्यातून कोविड लसीकरण मोहिमेला बदनाम करण्याचा प्रकार करीत आहेत. याप्रकारचे घाणेरडे राजकारण करणाऱ्या मंडळीचा मी निषेध व धिक्कार करीत असल्याचे महापौरांनी सांगितले. आमदार दिलीप लांडे प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना म्हणाले की, आर्याच्या आजोबांनी आताच वस्तुस्थिती सांगितली आहे. यामध्ये त्यांचे मत सर्वाधिक महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. महापौरांसोबत मी आज या ठिकाणी आल्यानंतर सदर कुटुंबियांना धीर दिला, तसेच त्यांचे सांत्वन केले. यानंतरही आर्याच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही कुटुंबीयांना दिली असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here