प्रभाग पुनर्रचनेवरील 27 लाख वाया जाणार?   

151
मुंबई महानगरपालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग पुनर्रचना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने प्रभाग पुनर्रचनेची 27 लाख 10 हजार रुपये खर्च केले होते. ते वाया जाणार कि महापालिकेने केलेली प्रभाग पुनर्रचना निवडणूक आयोग मान्य करेल, त्यामुळे ही रक्कम वाया जाणार नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

कुठे आणि किती खर्च झाला?  

प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने एकूण 27 लाख 10 हजार रुपये खर्च केले आहे. यात प्रभाग पुनर्रचनेत प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी शासकीय मुद्रण व लेखन सामग्री संचालनालय यांना 19.87 लाख रुपये इतक्या रक्कमेचे अधिदान करण्यात आले आहे. तसेच हरकती व सूचना या कार्यक्रमासाठी हॉलच्या भाड्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांना 3.97 लाख देण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचारी यांच्या भोजनासाठी मेसर्स सेंट्रल कॅटरर्स यांस 1.53 लाख, व्हिडीओ शूटिंग, एलईडी स्क्रीन करिता मे. आरंभ एंटरप्रायजेसयांना 1.52 लाख रुपये, स्टेशन करिता मे. वसंत ट्रेडर्स यांना 18 हजार आणि मेसर्स विपुल यांस 189 रुपये देण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याविषयीची माहिती मागवली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.