मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर छापा टाकून तब्बल ९० तास आयकर विभागाने घराची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांची डायरी चांगलीच चर्चेत आली होती, त्यामध्ये ‘मातोश्री’ या शब्दाचा उल्लेख आढळला होता. त्या मातोश्रीला २ कोटी दिल्याचा उल्लेख होता, आता याचा डायरीत एम ताई आणि केबलमॅन अशी दोन नवीन नावे समोर आली आहेत, त्यामुळे जाधव यांची ही डायरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
जाधवांची डायरी पुन्हा चर्चेत
यशवंत जाधव यांच्या डायरीत 2 कोटी रुपये आणि 50 लाख मातोश्रीला दिल्याचा उल्लेख होता, मात्र आणखी दोन नावांचाही उल्लेख आहे. जाधव यांच्या डायरीत शिवसेनेच्या आणखी दोन नेत्यांची नाव आहेत. त्यातील एक मंत्रीपदावर आहेत, तर दुसऱ्या महिला नेत्या आहेत, ज्या महापालिकेत वारंवार चर्चेत असतात. जाधव यांच्या डायरीत केबलमॅन अशा एका नावाचा उल्लेख आहे, त्यापुढे त्यांनी 75 लाख, 25 लाख आणखी 25 लाख असे एक कोटी 25 लाख दिल्याचा उल्लेख केला आहे. तर दुसरीकडे आणखी एक नाव एम ताई असे नाव लिहिलेले असून त्यापुढे 50 लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. या दोन लोकांविषयी आयकर विभागाकडून माहिती मिळवली जात आहे. लवकरच त्यांना समन्स जाण्याची शक्यता आहे. जाधव यांच्या डायरीतील केबलमॅन आणि एम ताई असा उल्लेख असणाऱ्या या व्यक्ती कोण याबद्दल अद्याप समजू शकलेल नाही.
(हेही वाचा आता भोंग्यांविरुद्धचा ‘आवाज’ मनसे न्यायालयात उठवणार?)
Join Our WhatsApp Community