खड्डयांवरील खर्चात भ्रष्टाचार; माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली चौकशीची मागणी

मुंबई मधील रस्त्यांवरील खड्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. मुंबई महापालिकेने ५० ते ६० कोटी रुपये खड्डे भरण्याकरीता खर्च केलेला आहे. हा सर्व खर्च वाया गेलेला आहे. यात भ्रष्टाचार झालेला दिसून येत असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी महापलिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना होणार निवड, ‘या’ ठिकाणी द्या थेट मुलाखत )

मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने असा दावा केला आहे की, मुंबईला खड्डे मुक्त करण्याचे दावे निष्फळ ठरलेले आहेत. मुंबईतील रस्त्यांकरीता २२०० कोटीचा खर्च सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला होता. यामध्ये रस्त्यांची कामे झालेली नाहीत. परिणामी रस्त्यावर खड्डयांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. एकंदरीत असे दिसते की, मुंबई मधील रस्त्यांवरील खड्डयांची संख्या वाढल्याने ते खड्डे भरण्यासाठी मुंबई महापालिका ५० ते ६० कोटी रुपये करत आहे. पण हा सर्व खर्च वाया गेलेला आहे. यात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. परिणामी यावर्षी मुंबईकरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला आहे. असा त्रास यापूर्वी मुंबईकरांना झालेला नव्हता. याला सर्वस्वी जबाबदार मुंबई महानगरपालिका आहे.

खड्डे मुक्त मुंबई करण्यामध्ये प्रशासन निष्फळ ठरलेले आहे. यावर्षीचा गणेशत्सवही मुंबईकरांनी अशाच खड्डे पडलेल्या रस्त्यावरच साजरा केलेला आहे. आता येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सवालाही सुरुवात होत आहे. पण या उत्सवापूर्वी मुंबई मधील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाचा आनंद मुंबईकरांना घेता येणार नाही. रस्त्यावरील खडे भरण्याकरीता जो कोट्यवधींचा खर्च झाला आहे, त्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे रवी राजा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे खड्डयांवर झालेल्या या खर्चाची सखोल चौकशी करण्यात याची, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येणाऱ्या दिवाळीपूर्वी मुंबईकरांना या रस्त्यावरील खड्डयांतून मुक्ती मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here