नगरसेवक ‘माजी’ व्हायला नाही ‘राजी’

158

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आल्याने २२७ अधिक ५ नामनिर्देशित नगरसेवकांचे महापालिका सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे सर्व नगरसेवक हे आता माजी झाले असले तरी ते माजी म्हणून घ्यायला राजी नसल्याचे मागील आठ दिवसांमध्ये दिसून येत आहे. महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्यावतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये नगरसेवक आणि नगरसेविकाच असाच उल्लेख होत असून खुद्द मंत्र्यांच्या फेसबूक तथा ट्विटमध्येही नगरसेवक तथा नगरसेविका असाच उल्लेख केला जात आहे. त्यामुळे या नगरसेवकांना आता आपण माजी झाला आहात याची समजूत कशी काढावा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : कोविड काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरकारी पक्षांना अभय! )

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आली तरी नव्याने निवडणूक न झाल्याने आता त्यांना प्रतीक्षा आहे ती सार्वत्रिक निवडणुकीची. एरव्ही ७ मार्च रोजी मुदत संपुष्टात होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच निवडणूक होत असल्याने महापालिकेत काही दिवस ४५९ नगरसेवक असायचे. परंतु नव्याने नगरसेवक निवडून आले तरी त्यांचा कालावधी ८ मार्चपासून सुरु होणार असल्याने ते नगरसेवक म्हणून निवडून आले तरी त्यांना महापालिका सद्स्यत्व न दिल्याने त्यांना नगरसेवकपद बहाल केले जात नाही. त्यामुळे नव्याने निवडून आले तरी जुन्या नगरसेवकांना कालावधी ७ मार्चपर्यंत राहणार असल्याने नवीन नगरसेवक निवडून आले तरी विद्यमान नगरसेवकाचा मान राखला जातो.

नगसेवक आजही माजी म्हणून घ्यायला तयार नाही

मात्र, मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने ७ मार्च रोजी महापालिका सदस्यत्व संपुष्टात आल्याने आजी नगरसेवक माजी बनले. परंतु प्रत्येक नगसेवक आजही माजी म्हणून घ्यायला तयार नाही. मागील काही दिवसांपासून नगरसेवकांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयाजन केले जात असून यामध्ये यामध्ये नगरसेवकाच्या नावापुढे माजी असा उल्लेख करणे टाळले जात आहे. चेंबुरमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका समृध्दी काते यांच्या प्रभागातील रमेश तेंडुलकर उद्यानाच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते पार पडले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये समृध्दी काते यांच्या नावापुढे नगरसेविका असा उल्लेख केला होता. तर समृध्दी काते यांनी केलेल्या आपल्या फेसबूक पोस्टमध्येही मंगेश सातमकर यांच्या नावापुढे विभागप्रमुख-नगरसेवक असा उल्लेख केला आहे. तर मंगेश सातमकर यांनी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये समृध्दी काते यांचा उल्लेख नगरसेविका असा केला आहे. तर शिवसेना महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्याहळकदी कुंकू कार्यक्रमाच्या फेसबूक पोस्टवर शितल म्हात्रे, संध्या दोशी, सुजाता पाटेकर, तेजस्विनी घोसाळकर, रिध्दी खुरसुंगे, माधुरी भोईर यांच्या नावापुढे नगरसेविका आणि हर्षद कारकर यांच्या नावापुढे नगरसेवक असा उल्लेख केला आहे.

तर भाजपच्या बीना दोषी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर व गोवा येथील भाजपच्या विजयाबाबत केलेल्या पोस्टमध्ये आपल्या नावापुढे नगरसेवक असाच उल्लेख केलेला आहे. तर भाजपच्या शीव येथील माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी सहा दिवसांपूर्वी अतुल भातखळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शुभेच्छुक म्हणून आपल्या नावापुढे माजी नगरसेविका व माजी स्थायी समिती सदस्या असा उल्लेख केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.