दिवंगत रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी या रिक्त झालेल्या जागेवर उभे राहावे, असा आग्रह पक्षाने धरला होता. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी महापालिकेतील लिपीक पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी एक महिन्याचा पगार देत हा राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली होती. मात्र त्यांचा राजीनामा पालिकेकडून स्वीकारण्यात आला नव्हता. दरम्यान, आज शुक्रवारी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – … म्हणून मुंबईत रविवारपासून जमावबंदी, आकाश कंदिलासह मिरवणुकांवरही बंदी)
आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगर पालिकेला दिले होते. यानंतर पालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचे पत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ऋतुजा लटके यांचा अंधेरी पोट निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२० रोजी ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही, असे महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मात्र न्यायालयाने त्यांचा राजीनामा मंजूर करणार आहात का, ते स्पष्ट करा असे सांगत चांगलेच फटकारले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर, मला न्यायदेवताकडून न्याय मिळाला आहे. आपण पतीचा वारसा पुढे नेणार आहोत. राजीनामा मंजूर झाल्याची प्रत मिळल्यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे ऋतुजा लटके यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
Join Our WhatsApp Community