संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि हुतात्म्यांचे बलिदान चिरंतन स्मरणात रहावे म्हणून आणि नवीन पिढीलाही हा इतिहास माहिती व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने BMC संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील वास्तूमध्ये करण्यात आली. परंतु तब्बल १३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले स्मृती दालन दुर्लक्षित असून आता या लढयाची माहिती आज पिढीला विशेषत: विद्यार्थी वर्गास व्हावी यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन येथील 3D मेश शोच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक वर्षांपूर्वी संस्थेची नेमणूक करण्यात आली. परंतु आजतागायत या शोचे आयोजन करण्यात आलेले नाही.
मुंबई महापालिकेच्या BMC वतीने उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाचे ३० एप्रिल २०१० रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पूर्णपणे वातानुकुलित असलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाच्या तीन मजल्यांवर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा संक्षिप्त इतिहास मांडण्यात आला आहे. सन २०१० ला हे स्मृती दालन सुरू झाल्यानंतर कोविड पासून पूर्ण पणे बंद आहे. कोविड नंतर हे सुरू करण्यात आले असले तरी लोकांना मात्र याची अद्याप कल्पना देण्यात आली ना पर्यटकांना या स्मृती दालनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.
संयुक्त महाराष्ट्र लढ्याची माहिती आजच्या पिढीला विशेषत: विद्यार्थी वर्गास व्हावी या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन येथे 3D मे शोच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यासाठी मे २०२२ रोजी अमर एंटरप्रायझेस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या शोचे चित्रफित बनवणे आणि त्यांची तीन वर्षांची देखभाल आदीकरतापरंतु वर्ष उलटले तरी या स्मृती दालनामध्ये या 3D मेश शोची चित्रफित बनवण्यात आली ना, त्यांचे त्याचे आयोजन मुलांसाठी केले गेले. या शोच्या आयोजनासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आले होते.
(हेही वाचा BMC : महापालिकेतील सुमारे १० कार्यकारी अभियंत्यांच्या बढतीचे प्रस्ताव रोखले कोणी)
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या मागील बाजूस असलेल्या तरण तलावावर ३० बाय ६० फुट आकाराची कायमस्वरुपी होलोग्राफीक मेश लावणे व त्या मेशवर प्रोजेक्टरवरून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढण्याचा १५ ते २० मिनिट लांबीचा 3D मेश शो प्रक्षेपित करणे आणि यासाठी मान्यवर तसेच अभ्यागतांना बसण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र कला दालनाच्या पहिल्या मजल्यावरील दर्शक गॅलरीमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात येईल,असे नमुद करण्यात आले होते.
विशेष म्हणजे १९ मे २०२२ रोजी जी उत्तर विभागाने अमर एंटरप्रायझेस या कंपनीची नेमणूक करण्यासाठी २५ लाख किंमतीच्या खर्चाला मान्यता दिली होती, परंतु त्यानंतर याचा खर्च तब्बल ६ कोटी ३९ लाख ४९ हजार ३७२ रुपयांवर जावून पोहोचला आहे. निविदा न मागवता ज्या कंपनीला यापूर्वी काम देण्याचा खटाटोप करण्यात आला होता, त्याच कंपनीला पुढे निविदा प्रक्रिया राबवून दोन कंपन्यांना बाद करून पुन्हा त्याच कंपनीला काम देण्यात आल्याने या कामाबाबत शंका उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community