मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाने ताबा मिळवल्यानंतर निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाला महापालिकेच्यावतीने टाळे ठोकून सील करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी या घटनेचा निषेध म्हणून महापालिकेच्या आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. दरम्यान शिवसेना पक्ष कार्यालयाच्या बाहेरील नाम फलका असलेल्या तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावावर पट्टी लावून त्यांचे नाव झाकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे शिवसेना गटाने ती पट्टी टाकली होती, परंतु गुरुवारी पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी त्यावर चिकटपट्टी लावून त्यांचे नाव झाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कार्यालयावरून निर्माण झालेला वाद अजून पेटला जाण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: ‘राऊतांना वेड्यांच्या रुग्णालयात भर्ती करा, ठाकरे गट म्हणजे दोस्ताना पार्ट 3’, राणेंचा घणाघात )
महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना गटाने दावा ठोकल्यानंतर दोन्ही गटांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर आणि कायदा सुव्यवस्थेतची भीती लक्षात घेत महापालिका आयुक्त यांनी पोलिसांशी चर्चा करून शिवसेना पक्ष कार्यालयाला टाळे ठोकत कार्यालय सील केले आहे. शिवसेना पक्ष कार्यालयासह आणि भाजप, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या कार्यालयांना टाळे ठोकले आहे.
बुधवारी घडलेल्या घटनेनंतर शिवसेना उद्धव गटाचे सर्व माजी नगरसेवक गुरुवारी महापालिका मुख्यालयात एकत्र जमले. पण कार्यालय सील केल्याने या घटनेचा जाब विचारण्यासाठी ते महापालिका आयुक्त यांची भेट घेण्यास गेले. पण आयुक्त तथा प्रशासक नसल्याने त्यांनी सरकार आणि आयुक्त यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या मारला.
Join Our WhatsApp Community