देशभरातील अनेक प्रकरणांमध्ये ईडीकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. या धाड सत्रामुळे काही मंत्री रडारवर आहेत तर काही मंत्री तुरूंगात आहेत. अशातच आता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ईडी असे बोर्ड लावण्यात आले आहेत. यामुळे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ईडीचे कार्यालय आहे, अशी चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. मात्र नेमकं काय आहे प्रकरण…
(हेही वाचा – नवी मुंबईत राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांचा धक्का, माजी नगरसेवकांसह तालुकाध्यक्ष शिंदे गटात)
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ईडीचे बोर्ड लागले आहे. ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला आहे. यापूर्वी मंत्रालयात आकडेवारीनुसार बोर्ड लावण्यात आले होते, मात्र यंदा नावाच्या अद्य अक्षरापासून बोर्ड लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर फडणवीस आणि शिंदे यांच्या अद्य अक्षराचा बोर्ड लावण्यात आला आहे. विरोधकांनी अधिवेशनादरम्यान शिंदे फडणवीस सरकारचा उल्लेख ईडी सरकार असा केला होता. त्यावेळी फडणवीस यांनी होय हे ईडीचेच सरकार आहे, असे म्हटले होते, यावेळी त्यांनी ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस असल्याचे म्हटले होते.
काय म्हणाले होते फडणवीस
मोठी बंडखोरी केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर पार पडलेल्या अधिवेशनात विरोधकांनी सत्तेत आलेले हे सरकार ईडीचं सरकार असल्याची टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते. हे स्पष्ट करताना ते म्हणाले होते की, होय राज्यात ईडीचं सरकार आहे. त्याबाबत अधिक स्पष्टता देत ते म्हणाले की, E म्हणजे एकनाथ तर D म्हणजे देवेंद्र.
Join Our WhatsApp Community