INS Vikrant Scam: उच्च न्यायालयाचा सोमय्या पिता-पुत्राला दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

103

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. INS विक्रांत घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन बुधवारी मंजूर केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी न्यायालयात असे सांगितले की, सोमय्यांविरोधात अद्याप कोणताही पुरावा आढळून आलेला नाही.

(हेही वाचा – “…त्यांना दुसऱ्या पक्षांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, शेलारांचा पलटवार)

काय आहे प्रकरण

INS विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी गोळ्या केलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा सोमय्या पितापुत्रांवर आरोप आहे. किरीट सोमय्यांनी २०१४ साली विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत साधारण ५८ कोटी रूपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, या घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी INS विक्रांत च्या निधीत घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकऱणी राऊत यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. याप्रकरणी अटकेची भिती असल्याने सोमय्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान मुंबई पोलिसांच्या माहितीनंतर न्यायालयाने सोमय्या पितापुत्रांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.