पवई सायकल ट्रॅक जानेवारी २०२२पर्यंत रखडला!

77

शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पवई तलावानजीकचा सायकल ट्रॅक प्रकल्प बारगळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकल्पाच्या कामाला दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. महापालिका आणि राज्य सरकार यांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला. त्यावर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 13 डिसेंबरपर्यंत तहकूब केली. या प्रकल्पाविरोधात आयआयटी पवईतील दोन विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यावर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सुनावणी झाली.

काय म्हटले आहे याचिकेत!

मुंबई पालिकेमार्फत पवई तलाव परिसराचा विकास करण्यात येणार असून तलावालगत सायकल, जॉगिंग ट्रॅक आणि तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या कामाला सुरुवातही करण्यात आली होती, मात्र हा ट्रॅक खारफुटीच्या जागेवर बांधण्यात येत असून त्यासाठी तलावात भराव टाकला जाणार आहे. तसेच या कामात इथली काही झाडेही तोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल, असा दावा करत ओमकार सुपेकर व अभिषेक त्रिपाठी या पीएचडी करणाऱ्या आयआयटीतील दोघा विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, पवई तलावानजीक अनेक मोठी झाडे आहेत, याशिवाय तिथे विविध प्रजातीचे प्राणी आणि पक्षीही आहेत. याशिवाय तलावात मगर, कासव व विविध जलचरांचही अस्तित्वात आहे. सायकल ट्रॅकमुळे या नैसर्गिक संपत्तीला हानी पोहचून जनावरांच्या नैसर्गिक अधिवासावर गदा येऊ शकते.

(हेही वाचा भगतसिंगांच्या फाशीला गांधींचा होता पाठिंबा! कंगना पुन्हा आक्रमक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.