नितेश राणेंना कधीपर्यंत होणार नाही अटक! काय म्हणाले उच्च न्यायालय?

संतोष परब यांच्या हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर अटक करण्याचा आदेश सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने दिल्यावर नितेश राणे यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर बुधवारी सुनावणी झाली असता राज्य सरकारने ‘जोवर नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असेल, तोवर त्यांना अटक करण्यात येणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने न्यायालयात दिली. त्यामुळे नितेश राणे यांना तेवढ्या काळापुरते अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

नितेश राणेंवर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर दोषरोप करण्यात आले. त्यांना अटक करण्याचा आदेश देण्यात आला. त्यावर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची थट्टा केल्याच्या आरोपावरून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सत्ताधारी पक्षांनी आपल्याविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल केली असे नितेश राणे यांचे वकील नितीन प्रधान म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत आपला सहभाग नसावा यासाठी आपल्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मारहाणीची घटना १८ डिसेंबर रोजी झाली, आणि निवडणूक ३० डिसेंबर रोजी होती. या प्रकरणी गुन्हा उशिरा दाखल झाला आहेअसेही वकील प्रधान म्हणाले.

(हेही वाचा अखेर मनसेचे ‘हे’ स्वप्न झाले साकार)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here