भाजप नेते किरीट सोमय्यांनंतर त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना देखील मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी आरोपांसंदर्भात तुर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तर पोलीस चौकशीला हजर राहण्यासह तपासात सहकार्य करण्याचे निर्देश नील सोमय्यांना न्यायालयाकडून देण्यात आले आहे. परंतु, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
Bombay High Court grants anticipatory bail to Neil Somaiya, son of BJP leader Kirit Somaiya, in the INS Vikrant corruption case.
— ANI (@ANI) April 20, 2022
सलग चार दिवस हजेरी लावणे बंधनकारक
28 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच 25 ते 28 एप्रिल असे सलग चार दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत त्यांना चौकशीकरता आर्थिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात हजेरी लावणे नील सोमय्यांसाठी बंधनकारक राहील, असे निर्देश न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी आपल्या निकालात दिले आहेत.
राऊतांचा सोमय्यांवर आरोप
आयएनएस विक्रांत निधीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी मुंबईत निधी गोळा केला होता. हा निधी राजभवानाकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. पण, सोमय्यांनी निधी राजभवनाला दिला नाही. त्याबाबतच पत्र राजभवनाकडून प्राप्त झाले आहे. सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या निधीमध्ये घोटाळासंजय राऊतांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना अटक होण्याची शक्यता होती. यानंतर सोमय्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. त्यानंतर आज किरीट सोमय्यांचा मुलगा नील यांना देखील न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.