शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पवई तलावाजवळचा सायकल ट्रॅक प्रकल्प मुंबई उच्च न्यायालयाने अखेर बेकायदेशीर ठरवला आहे. सायकल ट्रॅकसह येथील जॉगिंग ट्रॅकचे कामही बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या ड्रीम प्रोजेक्टचे स्वप्न भंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
(हेही वाचाः राज्यातील नेत्यांनीच थकवले करोडोंचे वीज बिल, वाचा कोणाची किती थकबाकी)
उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबईतील पवई तलावाजवळ सायकल तसेच जॉगिंग ट्रॅक सुरु करणे हा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. पण यामुळे अनेक झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार असल्याची याचिका ओमकार सुपेकर व अभिषेक त्रिपाठी या पीएचडी करणाऱ्या आयआयटीतील विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला बेकायदेशीकर ठरवले आहे. तसेच आतापर्यंत केलेले सर्व बांधकाम तोडून ती जाहा पूर्ववत करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
(हेही वाचाः अमेझॉन, फ्लिपकार्टवर एका वर्षात विकल्या गेल्या इतक्या बनावट वस्तू)
काय आहे याचिका?
हा ट्रॅक खारफुटीच्या जागेवर बांधण्यात येत असून त्यासाठी तलावात भराव टाकला जाणार आहे. तसेच या कामात इथली काही झाडेही तोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल, असा दावा याचिकाकर्त्यांनी या याचिकेत केला आहे.
Join Our WhatsApp Community