संतोष परब मारहाण प्रकरणी डोक्यावर अटकेची टांगती तलवार असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. बुधवारी मात्र नितेश राणे यांनी उच्च न्यायालयातून अर्ज मागे घेतला असून आता ते कणकवली न्यायालयात हजर राहण्यासाठी गेले.
(हेही वाचा सत्र न्यायालयानेही नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला! आता पुढे काय?)
पुन्हा कणकवली न्यायालयात हजर रहावे लागणार
परब यांना मारहाण झाल्याप्रकरणी कणकवली न्यायालयाने जामीन नाकारल्यावर नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात गेले, उच्च न्यायालयानेही जामीन नाकारल्यावर राणे सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज नाकारला. त्यावेळी न्यायालयाने राणे यांना १० दिवसांत शरण जा आणि जमीन अर्ज दाखल करा, असा आदेश दिला होता. त्याप्रमाणे राणे शरण न जाता आधी जामीन अर्ज दाखल केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यावर राणे हे पुन्हा उच्च न्यायालयात गेले. बुधवारी, २ फेब्रुवारी रोजी त्यांनी जामीन अर्ज मागे घेतला आणि कणकवली न्यायालयात शरण जाण्यास निघाले. त्यामुळे नितेश राणे यांना पुन्हा कणकवली न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
Join Our WhatsApp Community