संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, मात्र त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी संधी दिली आहे, परंतु त्यासाठी नितेश राणे यांना २७ जानेवारीपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असे सांगत त्यांना दिलासा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळी संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याचा दोष आमदार नितेश राणे यांच्यावर लावण्यात आला. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणे हे मुंबई उच्च न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.वी.भडंग यांनी त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला.
राणेंना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी
दरम्यान नितेश राणे यांना कठोर कारवाईपासून २७ जानेवारीपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले. गुरुवारी सुनावणीच्या वेळी पोलिसांतर्फे युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला आणि अॅड्. योगेश दबके यांनी राणे यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. हे प्रकरण राजकीय हेतुने प्रेरित असते तर २४ डिसेंबरला नितेश हे पोलिसांसमोर हजर झाले त्या वेळीच त्यांना अटक केली असती. त्यामुळे आदित्य यांच्याशी संबंधित हे प्रकरण नाही. तर राणे यांचा या प्रकरणी सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला. राणे हे सामाजिक प्रभाव असलेल्या कुटुंबातील असून प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत. राणे हे तपासात सहकार्यही करत नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांचा ठावठिकाणा देण्यास नकार दिल्याचे पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले होते.
Join Our WhatsApp Community