मलिकांना उच्च न्यायालयाचा दणका! वानखेडे कुटुंबाची बदनामी करण्यास मज्जाव

एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यासंबंधी आणि कुटुंबासंबंधी एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक हे दररोज नवनवीन खुलासे करतात, गंभीर आरोप करत असतात. त्यातून वानखेडे कुटुंबाची बदनामी होते, त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांंविषयी एकही पोस्ट सोशल मिडीयात करू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याकडून आमच्या कुटुंबाची बदनामी होत आहे. त्यामुळे त्यांना बदनामीकारक पोस्ट करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा, या मागणीसाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. उच्च न्यायालयाच्या एक सदस्य पीठाने मलिक यांच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी विरोध केला. त्या निर्णयाला मलिक यांनी उच्च न्यायालयाच्या द्वी सदस्यीय खंडपीठासमोर आव्हान दिले. त्यावर गुरुवारी, २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबियांविरोधात ९ डिसेंबरपर्यंत कोणतेही वक्तव्य करण्यास मज्जाव केला आहे.

(हेही वाचा आता नवाब मलिकांकडून वानखेडेंच्या आई बनल्या ‘टार्गेट’)

एक सदस्य पीठाचा काय होता निर्णय? 

खंडपीठाने ज्ञानदेव वानखेडे यांची मागणी फेटाळली होती. कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी माहितीची पडताळणी केली पाहिजे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही. नवाब मालक पोस्ट करू शकतात. परंतु कोणतीही गोष्ट पूर्ण पडताळणीनंतरच पोस्ट करावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here