चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डनला अटलबिहारी वाजपेयींचे नाव, २५ डिसेंबरला होणार लोकार्पण

116

चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बहुचर्चित बॉटनिकल गार्डनला देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असून, अटलजींच्या जयंतीदिनी २५ डिसेंबरला लोकार्पण करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करा, असे निर्देश वन आणि सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिले.

( हेही वाचा : चंद्रकांत पाटील, आदित्य ठाकरे एकत्र; बाप्पाच्या पालखीचे बनले भोई)

चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्ण असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करावे, यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात घेतलेल्‍या आढावा बैठकीत वनमंत्री मुनगंटीवार यांनी हे निर्देश दिले. वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक वायएलपी राव यांच्‍यासोबत झालेल्‍या बैठकीत त्यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वपूर्ण वनप्रकल्‍पांचा आढावा घेतला.

ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पामुळे चंद्रपूर जिल्‍हयाला पर्यटनाच्या दृष्‍टीने विशेष महत्त्व आहे.ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाला भेट देण्‍यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात.देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डन विसापूरमध्‍ये तयार होत असल्‍याने या गार्डनची देश-विदेशातील पर्यटकांनाही भुरळ पडणार आहे.वनसंपदा व वनेतर क्षेत्रातील जैविक संवर्धनसाठा बघण्‍यासाठी जगभरातील पर्यटक,अभ्‍यासक,विद्यार्थी या गार्डनला भेट देतील.या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्‍हणून पुढे येतील.त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व ग्रामस्थांची जीवनमान उंचावण्‍यासाठी मदत होणार आहे.या बॉटनिकल गार्डनचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे.बॉटनिकल गार्डन,कन्‍झर्वेशन झोन आणि रिक्रीएशन झोन अशा तीन विभागामध्‍ये उद्यान तयार होत आहे.या बॉटनिकल गार्डनला भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ताडोबात टायगर व बिबट सफारी सुरू करणार

  • ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प हे उत्‍तम पर्यटन स्‍थळ म्‍हणून जगाच्‍या नकाशावर यावे, यादृष्‍टीने वनविभाग प्रयत्‍नशील आहोत.या व्‍याघ्र प्रकल्‍पात टायगर व बिबट सफारी सुरू करण्‍याचा प्रकल्‍प अपूर्णावस्‍थेत आहे.या सफारीच्‍या माध्‍यमातून पर्यटकांना वन्‍यजीव दर्शनाची विशेष सोय उपलब्‍ध होणार आहे.यादृष्‍टीने देखील जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.
  • चंद्रपूर जिल्‍हयातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा रोजगार निर्मितीच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण प्रकल्‍प आहे.या प्रकल्‍पाच्‍या ठिकाणी बांबू कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे,आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्‍वयंपाकगृह इमारतीचे बांधकाम करणे तसेच विद्युत विषयक कामे प्रलंबित आहेत.यासाठी नुकताच १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.ही कामे जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.