काका पुतण्याचे नाते तसे तर फार विश्वास निर्माण करणारे, तसेच नात्यामध्ये विश्वास दर्शविणारे असल्याचे बोलले जाते. मात्र अलीकडच्या काळातील पासवान असो वा पवार यांच्यातील काका पुतण्याचे नाते बघितलं तर केवळ राजकीय पातळीवरील संघर्ष दिसून येतो. असाच राजकीय संघर्ष छत्तीसगडमधील काका पुतण्यांमध्ये देखील बघायला मिळणार आहे. (Chhattisgarh Elections)
मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचा पुतण्या विजय बघेल हे दोघेही काँग्रेस आणि भाजपच्या जागांवर लढणार आहेत. यामुळे निवडणूकी दरम्यान यांच्यातील तीव्र संघर्ष बघायला मिळणार आहे. काँग्रेसने छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ३० उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि टी. एस. सिंह देव यांचीही नावे आहेत. भूपेश बघेल सध्याचा त्यांचा मतदारसंघ पाटणमधूनच निवडणूक लढवणार आहेत, पण आता त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात तगडे आव्हान मिळणार आहे. (Chhattisgarh Elections)
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : दहशतवाद्यांनी नागरिकांच्या केलेल्या क्रूर हत्येचा व्हिडियो व्हायरल)
पाटणमधून मुख्यमंत्री बघेल यांचे नाव पुढे आल्यानंतर आता राजकीय लढाईत काका-पुतणे आमने-सामने येणार हे निश्चित झाले आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये भाजपने पहिल्या यादीत पाटणमधून भूपेश बघेल यांचे पुतणे विजय बघेल यांना तिकीट दिले होते. काँग्रेसची यादी जाहीर केल्यानंतर छत्तीसगडमध्ये ‘काका विरुद्ध पुतण्या’ संघर्ष होणार हे स्पष्ट झाले आहे. (Chhattisgarh Elections)
भाजपने ऑगस्टमध्ये पहिल्या यादीत दुर्गचे लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार विजय बघेल यांना पाटणमधून तिकीट आधीच जाहीर केले आहे. विजय बघेल हे छत्तीसगडच्या राजकारणातील एक तगडे नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय पाटणच्या जागेवर ओबीसी मतदारांची संख्या हाही एक मोठा घटक आहे. मुख्यमंत्री भूपेश आणि विजय हे दोघेही एकाच सामाजिक-जातीय पार्श्वभूमीतून येत असल्याने, या जागेवरची निवडणूक अत्यंत रंजक आणि चुरशीची होणार आहे. (Chhattisgarh Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community