- खास प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सायंकाळी सूप वाजले. १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२४ या सहा दिवसांत दोन्ही, विधानसभा आणि विधान परिषद, सभागृहाचे कामकाज दिवसाला सरासरी आठ तासही चालले नाही, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दिली. (Assembly Winter Session)
सहा-सात तास कामकाज
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या कामकाजाची माहिती दिली. त्यात नार्वेकर यांनी सांगितले की, सहा दिवसांत विधानसभेच्या सहा बैठका झाल्या. त्यात एकूण ४६ तास २६ मिनिटे प्रत्यक्ष कामकाज झाले. यातील १० मिनिटे वेळ वाया (सभागृह तहकूब) गेला तर दररोज सरासरी कामकाज ७ तास ४४ मिनिटे झाले. (Assembly Winter Session)
(हेही वाचा – Traffic Police : दंडाची थकीत रक्कम न भरल्यास वाहने जप्त होणार; वाहतूक पोलिसांची नवीन कार्यप्रणाली)
प्रत्यक्ष कामजाज किती?
अशाच प्रकारची माहिती विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दिली. परिषदेच्या एकूण सभा बैठकांमध्ये ३६ तासांचे प्रत्यक्ष कामकाज झाले आणि रोजचे सरासरी कामकाज ६ तास चालले. एकूण ३० मिनिटांचा वेळ वाया गेला त्यात मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे १० मिनिटे आणि अन्य कारणांमुळे २० मिनिटे वेळ गेला.
विधानसभेत एकूण १३ विधेयके मंजूर करण्यात आली तर विधान परिषदेत ४ विधेयके संमत झाली. (Assembly Winter Session)
सभागृहांतील उपस्थिती?
विधानसभेत आमदारांची जास्तीत जास्त उपस्थिती ८७.७६ टक्के होती तर कमीत कमी उपस्थिती ५३.१९ टक्के आणि सरासरी सहा दिवासातील उपस्थितीत ७९.८० म्हणजेच साधारण ८० टक्के होती, असे नार्वेकर यांनी संगितले. तर परिषदेत एकूण सहा दिवसातील सरासरी ७२.९० म्हणजेच ७३ टक्के होती तर जास्तीत जास्त ८७.८० टक्के आणि कमीत कमी ४८.३७ टक्के असल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले. (Assembly Winter Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community