बॉयकॉट बॉलिवूडमुळे भाजपाला ‘हा’ फायदा होऊ शकतो…

160

हिंदी चित्रपटाला अत्यंत वाईट दिवस आले आहेत. सलग अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. इतकी वाईट वेळ बॉलिवूडवर कधीच आली नव्हती. एक काळ होता जेव्हा बॉलिवुडचे कलाकार इन्फ्ल्युयन्सर होते. पण आता मात्र लोक त्यांनाच आव्हान देत आहेत. तर दुसरीकडे दक्षिण भारतीय चित्रपटांना खूप चांगले दिवस आले आहेत. दक्षिण भारतीय कलाकारांची लोक स्तुती करत आहेत. ते धर्माला चिकटून असतात. त्यांचे चित्रपट हिंदू धर्माचा अपमान करणारे नसतात असा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत.

( हेही वाचा : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : मविआची साथच तारु शकेल शिवसेनेला )

आता प्रश्न हा आहे की यात भाजपला काही फायदा होऊ शकतो का? भाजपचा आणि बॉयकॉट बॉलिवूडचा संबंध आहे का? भाजपचा या ट्रेंडशी तसा थेट संबंध नाही. परंतु याचा फायदा भाजप घेऊ शकतो. अमित साह यांना दक्षिण दिग्विजय करायचा आहे. त्यासाठी त्यांनी दक्षिण भारतातल्या सुपरस्टार्सची भेट घ्यायला केव्हाच सुरुवात केली आहे. दक्षिण भारतात लोक कलाकारांना देव मानतात आणि बर्‍याचदा त्यांचा शब्द शेवटचा देखील असतो.

हे कलाकार राजकारणात प्रवेश करतात आणि मोठे नेते होतात. दक्षिण भारताचं राजकारण अगदी वेगळं आहे. तिथे प्रवेश करण्याचा मार्ग सिनेसृष्टीतून जातो. म्हणूनच अमित शाह यांनी कलाकारांना भेटायला सुरुवात केली आहे. कदाचित त्यातले काही कलाकार भाजपमध्ये येतील किंवा निवडणुकीत भाजपला समर्थन देतील. यामुळे तिथे भाजपची सत्ता जरी आली नाही तरी भाजपला महत्वाचे स्थान प्राप्त होईल.

आता बोयकॉट बॉलिवूड ट्रेंडमुळे दक्षिण भारतीय चित्रपट चांगला व्यवसाय करत आहेत. एवढेच नव्हे तर बॉलिवूडपेक्षाही मोठी इंदस्ट्री तयार झाली आहे. पूर्वी बिग बजेट चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार व्हायचे. आता दक्षिण भारतीय चित्रपट बिग बजेट असतात आणि महत्वाचे म्हणजे हे चित्रपट सबंध भारतात प्रदर्शित होतात. अशा वेळी केंद्र सरकारने जर दक्षिण भारतीय चित्रपटाला प्रोत्साहन दिलं तर भाजपला दक्षिण भारतातल्या लोकांच्या मनात प्रवेश करता येणार आहे.

कारण त्यांच्यासाठी चित्रपट हा जिव्हाळ्याचा विषय आहे. अर्थात तिथली प्रादेशिक अस्मिता खूप मजबूत आहे. त्यामुळे मोदी-शाह यांना लगेच ते स्वीकारणार नाहीत. म्हणूनच अमित शाह तिथल्या स्टार्सचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडविरोधात उठणारा सूर कॅश करण्याची संधी भाजपला आहे आणि या संधीचा ते पूर्ण लाभ करुन घेतील यात शंका नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.