सध्या सोशल मीडियातून’ Boycott Hyundai’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यामागे कारणही तसेच आहे. ५ फेब्रुवारी हे काश्मीर एकता दिवस म्हणून साजरा होत असताना हुंडाईच्या पाकिस्तानच्या शाखेने कुरघोडी करत एक पोस्ट व्हायरल करत काश्मीरला स्वातंत्र्य मिळावे, अशी मनोकामना केली आहे. यामुळे भारतात हुंडाईच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
काय म्हटले आहे हुंडाईच्या ट्विटमध्ये?
हुंडाई या कंपनीच्या ट्विटमध्ये ‘काश्मीर बंधू ज्यांनी काश्मीरसाठी प्राण दिले त्यांची आठवण काढूया आणि ते ज्या स्वतंत्र काश्मीरसाठी सतत झगडत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहुया’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्या ट्विटमध्ये काश्मीर या शब्दाच्या भोवती तारेचे कुंपण दाखवण्यात आले आहे. या प्रकारचे ट्विट सोशल मीडियात व्हायरल होताच जनक्षोभ उसळला आहे. आणि Boycott Hyundai हा ट्रेंड सुरु झाला आहे. हजारो भारतीय आता हुंडाई कंपनीने माफी मागावी अशी मागणी करत आहेत.
(हेही वाचा शाहरूख खान लता ताईंच्या पार्थिव देहावर थुंकला? सोशल मीडियावर झाला ट्रोल)
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी काश्मिरातील दहशतवाद्यांना पाठिंबा देणे निंदनीय आहे. मी भारत सरकारला आवाहन करत आहे की, या प्रकरणी कडक करावी कारवाई करावी.
The support of @HyundaiPakistan to the terrorists in Kashmir is shameful .
I appeal to Govt. of India to take strict action against @Hyundai_Global for this irresponsible statement . #BoycottHyundai . pic.twitter.com/oi9JtlGesn— Ashoke Pandit (@ashokepandit) February 6, 2022
तर अंशुल सक्सेना यांनी ट्विट करत, आशा आहे की, हुंडाईला या विषयाचे गांभीर्य समजले असेल. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे या प्रकरणी हुंडाईने माफी मागावी. तसेच येणाऱ्या महिन्यात हुंडाई कंपनीने त्यांच्या गाड्यांचा विक्री दर घसरणार आहे, यासाठी तयार राहावे.
Hyundai in Pakistan is asking for freedom of Kashmir.
Hyundai Pakistan also posted them same on its Facebook page. Link: https://t.co/ZOBDggsdW0 pic.twitter.com/Kmmk2Rc1wu
— Anshul Saxena (@AskAnshul) February 6, 2022
आणखी एक नेटकरी हासी जोहरी यांनी ट्विट करत, हुंदाई कंपनीचे ट्विट हे अस्वीकार्य आहे. जर तुम्ही भारताला हुंडाईचे दुसरे घर समजता, मग भारताविषयी असे द्वेषपूर्ण ट्विट का करता? जर तुम्ही भारताप्रती प्रेम करता तर त्वरित माफी मागा, जर असे केले नाही तर कुणीही हुंडाईची गाडी खरेदी करणार नाही.
We demand @HMOIndia
Book sedition case against @HyundaiIndia who talk about infaour of Pakistan in Kashmir matterWe Indians #BoycottHyundai pic.twitter.com/wXvpvFfXJ8
— 🚩Mohan gowda🇮🇳 (@Mohan_HJS) February 6, 2022
(हेही वाचा मानवंदना देण्यासाठी धडपडणारे ठाकरे सरकार करणार होते लता दीदींची चौकशी!)
हुंडाईच्या भारताच्या शाखेकडून निषेध
हुंडाईसाठी भारत हे दुसरे घर आहे. आम्ही घडल्या प्रकाराविषयी अजिबात सहमत नाही. आम्ही याचा जाहीर निषेध करतो.
Join Our WhatsApp CommunityOfficial Statement from Hyundai Motor India Ltd.#Hyundai #HyundaiIndia pic.twitter.com/dDsdFXbaOd
— Hyundai India (@HyundaiIndia) February 6, 2022