Braille Voter Information Slip : अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिट्टी; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली माहिती

राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे १,१६,५१८ अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने ४०% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व ८५ वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छूक मतदारांना १२ डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

276
Braille Voter Information Slip : अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिट्टी; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली माहिती

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देणार असल्याचे माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

(हेही वाचा – IPL 2024, Hardik Pandya: मुंबई संघात दोन तट? हार्दिकच्या ट्रोलिंगवर संघात चर्चा)

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत एस. चोक्कलिंगम् बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते. (Braille Voter Information Slip)

एस. चोक्कलिंगम् यांनी सांगितले की,

राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे १,१६,५१८ अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील (Braille Voter Information Slip) मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने ४०% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व ८५ वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छूक मतदारांना १२ डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार राज्यभरातून २८ मार्च पर्यंत ८५ वयावरील जेष्ठ नागरिक यामध्ये १७ हजार ८५० मतदारांचे तसेच ४०% दिव्यांगत्व असलेले ५ हजार ४५३ दिव्यांग मतदारांचे १२ डी चे अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील ५३ मतदारांचे २८ मार्च पर्यंत १२ डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत. (Braille Voter Information Slip)

(हेही वाचा – Sanjay Nirupam : ‘कॉँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय उबाठा एकही जागा जिंकू शकत नाही’)

महाराष्ट्र राज्यासाठी विशेष निरिक्षक (Special General Observer)म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार व विशेष पोलिस निरिक्षक (Special Police Observer) म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी एन. के. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. राज्यामध्ये या निवडणूकीसाठी ९८ हजार ११४ इतक्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. (Braille Voter Information Slip)

परवाना नसलेली ५५७ शस्रे जप्त :

कायदा व सुव्यवस्था यंत्रणेमार्फत २८ मार्च पर्यंत २७,७४५ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत तसेच १९० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परवाना नसलेली ५५७ शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत २७,६८५ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.(Braille Voter Information Slip)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.