Brics conference : पंतप्रधान मोदींचे दक्षिण आफ्रिकेत उपराष्ट्रपतींकडून स्वागत; विमानतळावर चक्क आदिवासी नृत्य

149

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी, २२ ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पोहोचले आहेत. येथे त्यांचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती पॉल शिपोकोसा हे मोदी यांचे स्वागत करण्यासाठी वॉटरक्लफ एअरबेसवर पोहोचले. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची देखील उपस्थिती होती.

पंतप्रधान मोदींचे दक्षिण आफ्रिकेतील पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी विमानतळावर भारतीय वंशाच्या लोकांचीही भेट घेतली. मोदी 24 ऑगस्टपर्यंत जोहान्सबर्ग शहरात असतील. यादरम्यान ते ब्रिक्सच्या काही सदस्य देशांशी द्विपक्षीय चर्चाही देखील करतील.

(हेही वाचा Maharashtra : ऑगस्ट संपत आला तरी अर्धा महाराष्ट्र कोरडाच)

यापूर्वी 2018 मध्ये मोदींनी केला होता दौरा

यापूर्वी पीएम मोदी जुलै 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले होते. ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही जोहान्सबर्गला पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत पीएम मोदी त्यांची भेट घेऊ शकतात. ब्रिक्स गटात भारताव्यतिरिक्त चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील यांचाही समावेश आहे.

ब्रिक्सचे सदस्य होण्याच्या शर्यतीत 40 देश

14 वर्षांपूर्वी 2009 मध्ये स्थापन झालेल्या ब्रिक्स गटाची बैठक यावेळी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याचे एकमेव कारण म्हणजे या संस्थेचे सदस्य होण्याची स्पर्धा. सुमारे 40 देशांनी या संघटनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये सौदी अरेबिया, तुर्की, पाकिस्तान आणि इराणचा समावेश आहे. या बैठकीचा केंद्रबिंदू गटाचा विस्तार हा असेल. मात्र, पाच सदस्य देशांमध्ये या विषयावर एकमत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.