काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अवमान केल्यानंतर आता भाजप आणि शिवसेना यांनी राज्यभर वीर सावरकर गौरव यात्रा सुरु केली आहे. त्या यात्रेत एका जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतिहासातील एक दाखल दिला.
या गौरव यात्रेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांच्या लेखी पत्राचा एक किस्सा सांगितला. ११ वर्षे प्राणांतिक यातना भोगूनही भारत माता की जय म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. वीर सावरकर यांच्याशी तुलना कोणाचीही होऊ शकत नाही, म्हणूनच काँग्रेसला वीर सावरकरांची कायमच भीती राहिली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर आणि महात्मा गांधींचा एक किस्सा सांगितला. किंग जॉर्ज भारतात आले होते, त्यावेळी सर्वच कैद्यांना सोडून देण्याचे त्यांनी इंग्रजांना सांगितले होते. त्यानुसार, सगळ्या राजकीय कैद्यांना सोडून देण्यात आले. पण, त्याहीवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोडण्यात आले नाही. कारण, इंग्रजांना माहिती होते, हा डेंजरस आहे. हे बाहेर आले की आपले राज्य उठवल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे, महात्मा गांधीनी वीर सावरकर यांच्या बंधूंना पत्र पाठवून वीर सावरकरांना इंग्रजांकडे अर्ज करायला सांगितला होता. सगळे राजकीय बंदी सोडले मलाही सोडा. मात्र, वीर सावरकरांना सोडण्यात आले नव्हते, गांधींजींनी यावर लेखही लिहला होता, असा वीर सावरकरांच्या पत्राचा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी गौरव यात्रेत सांगितला.
(हेही वाचा ‘मी सावरकर’ कार्यक्रमाची दोन तिकिटे उद्धव ठाकरेंना पाठवणार – आशिष शेलार)
Join Our WhatsApp Community